पिंपळगाव हरेश्वर पोलीसांची वॉश आऊट मोहीम, अवैधधंदे करणारांचे धाबे दणाणले.
सुनील लोहार.(कुऱ्हाड)
दिनांक~०५/०३/२०२२
पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. महेंद्रजी वाघमारे साहेब हजर झाल्यापासून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने तसेच गोपनीय रीत्या पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावागावातील माहिती जाणून घेत सट्टा, पत्ता, जुगार, गावठी हातभट्टीची दारु तसेच देशी दिरुची अवैधपणे विक्री करणाऱ्या विरोधात धडक कारवाई सुरु केल्यामुळे अवैधधंदे करणारांना पळता भुई थोडी झाली असून या कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिक विशेष करून महिलावर्गातून समाधान व्यक्त होत असून या अवैधधंद्याचे विरोधात कारवाईत सातत्य ठेवून संपूर्णपणे सगळ्या प्रकारचे अवैधधंदे कायमस्वरूपी बंद करुन व्यसनाच्या आहारी जाणारे अल्पवयीन, तरुण मुले यांचे उध्वस्त होणारे आयुष्य व हजारो माता, भगिनींचे उध्वस्त होणारे संसार वाचवावेत अशी आशा व्यक्त केली आहे.
या धाडसत्राचे कारवाईत काल दिनांक ०४ एप्रिल २०२२ सोमवार रोजी शींदाड येथे अवैधरित्या गावठी दारुची विक्री करणाऱ्या धनराज भिका पाटील या इसमांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. तसेच भोजे या गावी श्रीकृष्ण रामदास जाधव या इसमावर श्रीकृष्ण जुगार प्रतिबंधक अधिनियाचे कलम १२ (अ) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. तसेच आज दिनांक ०५ एप्रिल २०२२ मंगळवार रोजी कुऱ्हाड येथील आदर्श विद्यालयाच्या मागील नदीपात्रात तसेच धरणाच्या परिसरात गावठी दारू बनविणाऱ्या भट्टीवर कारवाई करत शिवदास तोताराम ठाकरे व प्रवीण किसन सोनावणे या दोन इसमांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच कुऱ्हाड येथील एका शेतात सट्टयाचा आकडे घेणाऱ्या पांडुरंग तिरमल या इसमावर कारवाई करून त्याच्याविरुद्ध जुगार प्रतिबंधक अधिनियम (१२) अ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
या अवैधधंद्याचे विरोधात मा.पोलीस अधिक्षक मा. श्री. प्रविणजी मुंडे, अप्पर पोलीस अधिक्षक मा.श्री. रमेशजी चोपडे तसेच पोलीस उप अधिक्षक मा. श्री. भरतजी काकडे यांचे मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत असलेल्या कारवाईत दिनांक ०५ एप्रिल २०२२ मंगळवार रोजी गोपनीय माहिती मिळाल्यावरुन कुऱ्हाड खुर्द शिवारात शिवदास तोताराम ठाकरे (भिल) हा श्रीराम देशमुख यांच्या शेता जवळील नाल्याच्या काठावर झाडाझुडुपांच्यायला आडोशाला सार्वजनिक जागेवर गावठी हातभट्टीची दारु तयार करण्यासाठी भट्टी रचून दारु गाळत असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. महेंद्रजी वाघमारे यांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे त्यांनी पोलीस हेड कॉन्स्टेबल मा.श्री. रणजित पाटील, पोलीस नाईक मा. श्री. अरुण राजपूत, पोलीस हवालदार मा.श्री. अरविंद मोरे, पोलीस कॉन्स्टेबल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल मा.श्री. ज्ञानेश्वर बोडके, पोलीस कॉन्स्टेबल मा. श्री. विकास पवार, पोलीस कॉन्स्टेबल मा. श्री. पंकज सोनावणे, पोलीस नाईक मा. श्री. शिवनारायण देशमुख यांना सोबत घेत लपतछपत जाऊन कुऱ्हाड खुर्द शिवारातील शीवदास तोताराम ठाकरे (भील) याच्या दारुच्या अड्ड्यावर आज सकाळी ०७ वाजुन ४५ मिनिटे यावेळी धाड टाकून त्याला रंगेहाथ पकडून ६०००/- रुपयाचे नवसागर गुळ मिश्रीत कच्चे रसायन, १०० लीटर मापाचे ४ ड्रम (टाक्या) मध्ये प्रत्येकी २५ लीटर असे एकूण १०० लीटर अंदाजे किंमत १४००/०० रुपयांचे गुळ रसायन तसेच ४० लीटर मापाच्या दोन पत्री ड्रममध्ये प्रत्येकी २० लीटर उकळते रसायन अंदाजे किंमत ३५००/०० रुपये, तसेच २० लिटरच्या मध्ये २० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारु अंदाजे किंमत ७९००/०० असा मुद्देमाल घटनास्थळावरून ताब्यात घेत प्रोव्ही. गुन्ह्याच्या मालापैकी १८० मिली मापाच्या काचेच्या बाटलीत कच्चे व पक्के रसायन सी. ए. तपासणी नमुन्या करीता पंचांच्या समक्ष, पंचांच्या सह्यांचे लेबल डकवून सिलबंद केले व गुन्ह्यातील उर्वरित कच्चे रसायन व दारु पंचांंसमक्ष पोलीस हेड कॉन्स्टेबल मा. श्री. रणजीत पाटील यांनी जागीच नाश केला.
या कारवाईत आरोपी शिवदास तोताराम ठाकरे याच्या विरोधात पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर नामदेव बोडके यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (फ), (ब), (क), (ई) प्रमाणे कायद फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
तसेच दुसऱ्या कारवाईत कुऱ्हाड खुर्द येथून जवळच असलेल्या लाख तांडा शिवारातील उंबरदड धरणाच्या काठावर झाडाझुडुपांमध्ये आडोशाला कुऱ्हाड खुर्द येथील प्रविण कीसन सोनवणे हा राहणार कू-हाङ खू हा लाख तांडा शीवारात उबरदंड धरणाचे काठावर झाडाझुडपांचे आडोशाला गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याची भट्टी रचुन दारू गाळत आहे. अशी माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाल्याने खात्री झाल्यावर रेड टाकण्यासाठीचे साहित्य सोबत घेत खाजगी वाहनातून जाऊन वाहन थोड्या अंतरावर उभे करुन लपतछपत जाऊन सकाळी ०९ वाजून ३० मिनीटांचे सुमारास उंबरदड धरणाच्या काठावर झाडाझुडुपांमध्ये एका इसमाने भट्टी लावलेली दिसून आली. या भट्टी जवळ जाऊन पाहिले असता प्रविण किसन सोनवणे राहणार कुऱ्हाड खुर्द हा भट्टीत जाळ लावतांना दिसून आल्यावर पोलीसांची व पंचांची खात्री झाल्यानंतर प्रविण सोनवणे यास ताब्यात घेत १०० लीटर मापाच्या दोन (टाक्या) ड्रममध्ये प्रत्येकी ५० लिटर असे एकुण १०० लीटर अंदाजे ३०००/०० रुपये किंमतीचे गुळ मिश्रीत रसायन तसेच ४० लिटर मापाच्या पत्री ड्रममध्ये ३० लिटर पक्के उकळते रसायन अंदाजे किंमत १०००/०० रुपये व ४० लिटरच्या ड्रममध्ये ३० लिटर गुळ मिश्रीत पक्के रसायन, २० लिटर मापाच्या प्लॅस्टिक मध्ये २० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारु अंदाजे किंमत ११००/०० रुपये मिळुन आला असून गुन्ह्यातील मालापैकी सी. ए. नमुन्याकरीता १८० मिली मापाच्या काचेच्या बाटलीत कच्चे व पक्के रसायन घेऊन पंचाच्या सह्याचे लेबल डकवून सिलबंद केले व कच्चे, पक्के रसायनचा माल पंचासमक्ष जागीच नाश करत जागेवरच सविस्तर पंचनामा करत पंचासमक्ष पोलीस हेड कॉन्स्टेबल रणजीत पाटील यांनी प्रविण कीसन सोनवणे राहणार याच्या विरुध्द महाराष्ट्र दारूबंदि अधि कलम ६५ (फ), (ब), (क), (ई) प्रमाने कायदेशीर फिर्याद देत गुन्हा दाखल केला आहे.
या धडक कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे यांच्या सोबत पोलीस हेड कॉन्स्टेबल मा. श्री. रणजीत पाटील, पोलीस नाईक मा. श्री. अरुण राजपूत, पोलीस हवालदार अरविंद मोरे, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर बोडके, पोलीस कॉन्स्टेबल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल विकास पवार, पोलीस कॉन्स्टेबल पंकज सोनवणे, पोलीस नाईक शिवनारायण देशमुख यांनी चोख कामगिरी बजावली.