सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भडगाव, पाचोरा बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उफाळला; दलाल–अधिकारी संगनमताचा पर्दाफाश, SIT व आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीची मागणी.

  • पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामविकास विद्यालयातील भरतीवर वाद आरक्षण नियम न पाळल्याचा आरोप; प्रकरण हायकोर्टात.

  • गर्भपात करतांना बंदी असलेल्या औषधांचा वापर, डॉक्टरला अटक, मात्र संबंधित औषध विक्रेता मोकाटच.

  • पोलिस काकाकडून अल्पवयीन पुतणीवर अत्याचार; गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक.

  • लोहारा गावातील ‘करवंदाच्या’ झाडाखाली उघडपणे गुटखा विक्री सुरुच; कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी.

राजकीय
Home›राजकीय›ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण आबाधित करण्यासाठी, चलो पाचोरा, चलो पाचोरा.

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण आबाधित करण्यासाठी, चलो पाचोरा, चलो पाचोरा.

By Satyajeet News
August 10, 2021
878
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

कृपया प्रसिद्धीसाठी*
दिनांक~१०/०८/२०२१.

पुरोगामी विचारसरणीचे देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वात व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे नाथाभाऊ त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभरात ओबीसीचे रद्द झालेले राजकीय आरक्षण बचाव जनसंपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे.

म्हणून ओबीसीचे रद्द झालेले राजकीय आरक्षण बचाव जनसंपर्क अभियानची पहिल्या टप्प्याची सुरुवात जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरातून करण्यात येत असून ओबीसीचे रद्द झालेले राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी आरक्षण बचाव जनसंपर्क अभियान राबवण्यासाठी महाबैठक, मेळाव्याचे आयोजन येत्या १६ ऑगस्ट २०२१ सोमवार रोजी दुपारी २ वाजेपासून तर सायंकाळी ६ वाजेपर्यंत पाचोरा येथील स्वर्गीय राजीव गांधी टाऊन हॉल दुसरा मजला, मानसिंगका कॉर्नर शिवाजी महाराज चौक आयोजित करण्यात आला असून या महाबैठक मेळाव्यासाठी जिल्हाभरातील ओबीसी समाजातील प्रमुख समाज बांधव उपस्थित राहणार आहेत.

हा महाबैठक मेळावा ओबीसी नेते मा.श्री.अनिलभाऊ महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात येणार असून सुप्रीम कोर्टाने रद्द केलेले ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पुन्हा आबाधित करा या मागणीसाठी सर्वपक्षीय ओबीसी समाजातील प्रमुख लोक पाचोरा येथे मेळावा मध्ये एकत्र येऊन विचारविनिमय करून पुढील दिशा ठरवणार आहेत.

ओबीसीचे रद्द झालेले राजकीय आरक्षण बचाव जनसंपर्क अभियान ओबीसींच्या हितासाठी ओबीसी समाजाच्या अनेक राजकीय आर्थिक सामाजिक प्रश्न सोडवण्याच काम करणार आहे. सदर महाबैठक- मेळावा हा सर्व ओबीसी बहुजनांसाठी आहे. कोणीही निमंत्रणाची वाट पाहू नये आपल्या हक्कासाठी आपल्या अस्तित्वासाठी जिल्हाभरातून सर्व ओबीसी समाज बांधवांनी एकत्र यावे हीच ती वेळ आपले संघटन कौशल्य दाखविण्याची आहे.

अभी नही तो कभी नही असा बाणा हाती घेऊन आपल्या भावी पिढीच्या उज्वल भविष्यासाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व राजकीय सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या ओबीसी राजकीय आरक्षण बचाव महाबैठक मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आव्हान ओबीसी नेते व ए.एम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. अनिल भाऊ महाजन यांनी जळगाव जिल्ह्यातील ओबीसी बांधवांना केले आहे.

अठरापगड जाती,बाराबलुतेदार,आलुतेदार समाजावर नेहमीच अन्याय होत आलेला आहे. त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचे प्रश्न असतील शिष्यवृत्तीचा विषय असेल प्रत्येक ठिकाणी यांना संघर्ष करावा लागतो. ओबीसी समाजातील माळी, धनगर वंजारी ,तेली ,तांबोळी,धोबी, परीट, सोनार, कुणबी ओबीसी मधील सर्व मुख्य घटकाने एकत्र येणे ही काळाची गरज आहे. राज्यभरात ओबीसी समाजाच्या अनेक लहान मोठ्या संघटना आपपल्या परीने ओबीसीचे राजकीय आरक्षण वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. प्रत्येक ठिकाणी जनजागृती मोहीम राबवली जात आहे.

देशाचे नेते आदरणीय मा.श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांनीच ओबीसी समाजाला मंडल आयोग लागू करून आरक्षण मिळवून दिले आहे. आणि आता सुद्धा पवार साहेबच ओबीसीचे रद्द झालेल्या राजकीय आरक्षण शरद पवार साहेब मिळवून देतील यात काही शंका नाही. यासाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे (नाथाभाऊ) मोठ्या प्रमाणावर प्रयत्नशील आहेत यासाठी आपल्याला या जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून नाथाभाऊ खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील आपली ओबीसी बांधवांची एकी दाखवायची आहे. म्हणून समाजबांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपला पाठिंबा द्यावा असे आवाहन ओबीसी नेते मा.श्री. अनिल महाजन यांच्यातर्फे गणेश पुजारी यांनी केले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 182
Previous Article

लॉकडाऊनच्या कालावधीत गरिब कुटुंब होत आहेत, हातोहात ...

Next Article

शेंदुर्णी येथे स्वच्छता पंधरवाड्याच यशस्वी नियोजन सुरवात.

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • राजकीय

    मा. आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेत सामिल व्हा सौ. वैशाली ताई सुर्यवंशी याचे जाहीर आवाहन.

    August 8, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorizedराजकीय

    आपसातील मतभेद दुर विसरून पाचोरा तालुक्यातील १० ग्रामपंचायती बिनविरोध, राजकारणाच्या सकारात्मक पायंड्याचे सर्वत्र कौतुक.

    January 4, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    भडगाव व पाचोरा शहरांची बंप्पर लॉटरी ;१५५ कोटी रुपयांच्या विकासनिधीस मान्यता, विविध कामांना मंजुरी – आ.किशोर पाटील यांच्या प्रयत्नांना ...

    February 6, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    वाघाची कातडी पांघरुण वाघ बनू पाहाणाऱ्या ढोंगी गाढवावर, शिवसेनेच्या वाघाचा प्रतिहल्ला.

    March 17, 2022
    By Satyajeet News
  • राजकीय

    सावखेडा खुर्द विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत महा विकास आघाडीच्या सहकार पॅनलचा दणदणीत विजय.

    June 5, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगावराजकीय

    लोहटार ग्रामपंचायत सरपंचपदी सौ.मनीषा वाणी तर उपसरपंचपदी श्री. योगेश माळी.

    February 13, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorized

    अंबे वडगाव येथे विवाह सोहळ्यात हिंदू, मुस्लिम एकतेचे दर्शन, मुस्लिम बांधवांच्या हातून हिंदू मुलीचे कन्यादान.

  • आरोग्य

    पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील बालकाच्या मृत्यूप्रकरणी तब्बल एक महिना उलटला तरीही दोषींवर कारवाई नाही.

  • सांस्कृतिक

    प्रति पंढरपूर शेंदुर्णी नगरीत गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर श्रीराम जन्मोत्सवास प्रारंभ.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज