नातवाने मारहाणीचा केलेला व्हिडीओ पडला महागात, शेवटी कायदेशीर बेड्या पडल्या स्वताला ह.भ.प समजणाऱ्या बाबांच्या हातात.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०६/२०२१
वृद्ध पत्नीला मारहाण करणाऱ्या ८५ वर्षीय वृद्धाला पोलिसांनी अखेर अटक केली. संबंधित प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आरोपी गजानन बुवा याच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी वाढली होती. मागणीमुळे पोलिसांवरील सामाजिक दबाव वाढला होता. अखेर हिललाईन पोलिसांनी आरोपी विरोधात सुमोटोने गुन्हा दाखल केला आहे. आणि एक पथक आळंदीला रवाना केला. त्यानंतर अखेर पोलिसांनी आरोपी गजानन बुवा चिकणकर याला बेड्या ठोकल्या आहेत.
( शेवटी वयोवृद्ध महिला मारहाण करणाऱ्या महाराजांचा शोधून अटक केलीच,आणि माऊलीला न्याय मिळाला.हेच खरे कर्तव्यदक्ष महाराष्ट्र पोलीस!सलाम)
याबाबत समाजसेवक मा.श्री. सुमीत पंडीत यांनी सत्यजीत न्यूजला एक चित्रफीत पाठवून संबंधित बाबांवर कडक कारवाईची मागणी केली होती. तसेच बऱ्याच (ह.भ.प.किर्तनकार बाबांनी सत्यजीत न्यूजकडे भ्रमणध्वनीवर या बाबा बदल निषेध नोंदवला होता.) महाराष्ट्रात सर्वदूर त्रा घटनेचा निषेध केला जात होता याची दखल घेत पोलिसांनी संबंधीत बाबांवर कारवाई करत बेड्या ठोकल्याचे खात्रीपूर्वक समजले
घरात पाण्याच्या वादावरुन एका ८५ वर्षीय वृद्धाने ८० वर्षीय त्याच्या पत्नीला मारहाण केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. महिलेला मारहाण करणारा इसमाचे नाव गजानन बुवा चिकणकर असे आहे. संबंधित घटना ही ३१ मे रोजी घडली आहे. गजानन बुवाच्या १३ वर्षीय नातवाने संबंधित प्रकाराचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला होता. तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी नराधम वृद्ध वर कारवाई करण्याची मागणी केली आहे.