वरखेडी येथे भांड्याचे दुकान फोडून ७४ हजाराचा मुद्देमाल लंपास ; पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०८/२०२१
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील भांड्याचे दुकान फोडून भांड्यांसह रोकड असा एकुण ७४ हजार रूपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील वरखेडी येथील भांडे व्यावसायिक जाफर ईमाम कहाकर (वय-४४) रा. वरखेडी ता. पाचोरा यांचे शहरातील सांगवी छोटू डॉक्टर यांच्या खळ्याजवळ भांड्याचे दुकान आहे. ३१ जुलै रोजी रात्री ९ ते १ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी भांड्याचे दुकान फोडून दुकानातील भांडे व ५० हजाराची रोकड असा एकुण ७४ हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी जाफर कहाकर यांच्या फिर्यादीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय माळी करीत आहे.