“सावलीच भुत अण आफवांना ऊत” मुले पळवणारी टोळी समजून भल्याभल्यांना मारपीट.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/०९/२०२२
संपूर्ण महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यात तसेच पाचोरा तालुक्यात लहान मुलांना पळवणारी टोळ्या आपल्या गाव परिसरात आल्या असुन ह्या टोळ्या मुलामुलींना उचलून नेत त्यांची विक्री करतात तसेच या अपहरण करून पळवून नेलेल्या मुलामुलींच्या किडणी, डोळे काढून घेतात कश्या पद्धतीने भयवाह छायाचित्रासह संदेश तयार करुन सोशल मीडियावर किंवा अन्य पध्दतीने मोबाईलव्दारे सर्वदूर पाठवून जनमानसातून गैरसमज व भिती परसवत असल्याचे सगळीकडे दिसून येत आहे.
या अफवांमुळे बऱ्याचशा ठिकाणी चारचाकी किंवा दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या वाटसरुंना अडवणूक करून त्यांच्यावर संशय व्यक्त करत कोणतीही प्रकारची शहानिशा न करता गुराढोरांसारखी जिवघेणी मारठोक करण्याच्या घटना घडत आहेत. परंतु ज्यांना, ज्यांना मारठोक करण्यात आली किंवा नहाकच अडवणूक करण्यात येत आहे. अश्या सभ्य व कामानिमित्त प्रवास करणाऱ्या प्रतिष्ठित वाहनधारकांचा (वाटसरुंचा) मुले पळवणाऱ्या टोळीशी काडीमात्र संबंध नसतांना तसेच संपूर्ण महाराष्ट्रात अश्या मुले पळवणाऱ्या टोळ्या अस्तित्वात नसतांनाच काही ठिकाणी स्वताला समाजसेवक समजून चमकोगीरी करण्यासाठी या अफवा पसरवून या अफवांचा फायदा घेत हा गैरप्रकार सुरु आहे. म्हणून सावलीचे भुत अण आफवांना ऊत असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
(ऊसतोड मजूर मुकादम व सण, उत्सव व यात्रा उत्सव निमित्त फिरणाऱ्या व्यवसायिकांवर संक्रांत)
सद्यस्थितीत सुगीचे दिवस असल्याने व पुढे दसरा, दिपावली व गावागावांतील यात्रा उत्सव तसेच ऊस कारखान्याला मजूर घेऊन जाण्यासाठी मुकादम फिरत आहेत. हे व्यवसायीक व यात्रा उत्सवानिमित्त भटकंती करणारे खेळणे विक्रेते, रहाट पाळणा व इतर व्यावसायिक तसेच मजूरांचे मुकादम हे आपल्या स्वयंचलित चारचाकी किंवा दुचाकीवरून भटकंती करत आहेत. परंतु या लोकांना संशय घेऊन मुले पळवणाऱ्या टोळीशी संबंध जोडून अडवणूक करून मारठोक करण्याच्या घटना सतत घडत असल्याने ऊसतोड मजूर मुकादम तसेच भटकंती करणारे व्यवसायीक धास्तावले असल्याचे दिसून येत आहे.
सुचना~
मुले पळवणाऱ्या किंवा चोऱ्या करणाऱ्या कोणत्याही टोळ्या सक्रिय नसून ह्या अफवा उठवून काही समाजकंटक आपला वाईट हेतू साध्य करुन अशांतता पसरवण्यास प्रयत्नशील आहेत. म्हणून कुणीही अश्या अफवांवर विश्वास ठेऊ नये व असे काही संशयास्पद लोक आढळून आल्यास त्यांना मारठोक न करता गावातील पोलीस पाटील किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला माहिती द्यावी अशी सुचना सत्यजित न्यूज तर्फे करण्यात येत आहे.