अमळनेर समता परीषदेतर्फे ओ.बी.सी आरक्षण बचावासाठी तहसीलदारांना निवेदन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/११/२०२०
अमळनेर-येथील अ.भा महात्मा फुले समता परीषदेच्या वतीने ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी राज्य सरकारने उच्य व सर्वोच्य ज्ञायालयात वकील नियुक्त करावा व ओबीसी कोट्याला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे ह्या मागणीचे निवेदन तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना देण्यात आले.मराठा समाजाचा समावेश ओबीसींमधे झाल्यास ५२% लोकसंख्या असलेल्या ओबीसींना अवघ्या १७% जागा दिल्या गेल्या आहेत आणि त्यातल्या १२% जागाच भरल्या आहेत अशा अवस्थेत मराठा समाजाला घेतल्यास त्यांनाही काही मिळणार नाही व ओबीसींचेही नुकसान होईल असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष अमोल माळी,शहराध्यक्ष प्रताप पाटील,जिल्हा सरचिटणीस प्रा भिमराव महाजन,नगरसेवक धनंजय महाजन,शहर उपाध्यक्ष महेश कासार,जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य पंकज चौधरी,नगरसेवक बाळासाहेब संदानशिव,मा उपनगराध्यक्ष गोपी कासार,भाजपा उपाध्यक्ष महेंद्र महाजन,सामाजिक कार्यकर्ते पंकज भावसार,मा उपनगराध्यक्ष अनिल महाजन,जेष्ठ पदाधिकारी बाबुलाल पाटील,जिल्हा पदाधिकारी दिनेश माळी,केमिस्ट असोसिएशनचे प्रविण महाजन,जिल्हा पदाधिकारी मुरलीधर चौधरी,ता.उपाध्यक्ष शिवाजी महाजन,ता सरचिटणीस हेमंत महाजन,रामकृष्ण शेलकर,अनंत महाजन,चेतन मगरे,नगरसेवक देवीदास महाजन,उमाकांत ठाकुर आदि ओबीसी बांधव उपस्थित होते.