ज्ञानारंभ सेवाभावी संस्थतर्फे सांगली येथील महापुरग्रस्तांना अन्नधान्य वाटप.

धुळे(प्रतिनिधी)
दिनांक~३१/०८/२०२१
सांगली येथे झालेली अतिवृष्टी व नद्यांना आलेल्या भीषण महापुरत नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. म्हणून आपण समाजिचे काही देणे लागतो ही भावना मनात ठेवून सांगली येथील पूरग्रस्त नागरिकांना मदत व्हावी या उद्देशाने समाजकार्य असो वा समाजप्रबोधन असो अश्या जनहित कार्यात नेहमी अग्रेसर असणारी महाराष्ट्र राज्य स्थित डोंगरगाव, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे येथील ज्ञानारंभ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे खारीचा वाटा उचलण्यात आला.
या संस्थेतर्फे स्वखर्चाने सांगली येथील महापुरग्रस्त कुटुंब सौ. साळुंखे व श्री. सुरेश साळुंखे राहणार सांगली यांना दिनांक ३० ऑगस्ट २०२१, सोमवार रोजी सांगली येथे गहु, तांदुळ, डाळी असे अन्नधान्य वाटप करण्यात आले.
याप्रसंगी ज्ञानारंभ संस्थेचे संस्थापक मा. श्री। रामचंद्र बाबुलाल पाटील यांनी संबंधीत व उपस्थित कुटुंबीयांची विचारपूस करून वेळोवेळी होणाऱ्या पुरपरिस्थितीत कुटुंबाची काळजी घ्या व काही अडीअडचणी असल्यास निसंकोचपणे आम्हाला सांगा आम्ही आमच्या संस्थेमार्फत योग्य ती मदत करु जेव्हा केव्हा मदत लागेल तेव्हा आमच्या संस्थेशी संपर्क करा संस्थेतर्फ मदतीचे हाथ सदैव तयार असतील असे आश्वासन देत मायेचा आधार दिला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते मा.श्री सत्यजित पिसाळ, मा.श्री. महेश लाड, श्री अमितभाऊ जाधव, श्री गणेशदादा पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.