सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • अनफिट, नादुरुस्त स्कूलबसमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात, प्रादेशिक महामंडळाकडून कारवाई अपेक्षित.

  • कायद्याची राहिली नाही भीती, गोळीबार करणाऱ्या आरोपींची जामनेर पोलीसांकडे शरणागती.

  • पाचोरा बसस्थानक गोळीबारातील जखमी आकाश मोरेचा जागीच मृत्यू.

  • पाचोरा बसस्थानक परिसरात भरदिवसा गोळीबार, एक गंभीर जखमी.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्कूलबस व दुचाकीचा अपघात, दुचाकीस्वार गंभीर जखमी.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›पाचोरा, भडगाव शहरामध्ये मध्ये ११ ते ५ या वेळात नाभिक व्यवसायाला परवानगी द्या.(कॉग्रेस ने दिले शासनाला निवेदन.)

पाचोरा, भडगाव शहरामध्ये मध्ये ११ ते ५ या वेळात नाभिक व्यवसायाला परवानगी द्या.(कॉग्रेस ने दिले शासनाला निवेदन.)

By Satyajeet News
June 2, 2021
263
0
Share:
Post Views: 40
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक.०२/०६/२०२१

लॉकडाऊनच्या कालावधीत मध्ये व्यापारी वर्गाची वेळ बदलवुन मागिल काळातील जळगाव पॅटर्न लावावा वेळ ११ते ५ करुन नाभिक समाजालाही परवानगी द्यावी अशी मागणी कॉग्रेसने आज पाचोरा प्रातंअधिकारी मा.श्री.राजेंद्रजी कचरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

कोरोना महामारीत व्यापारी बर्बाद झाले आहे. आर्थिक व्यवहार पुर्णपणे ठप्प झाले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत शासनाने लॉकडाउन मध्ये शितीलता आणली आहे. मात्र वेळ सकाळी ७ ते दुपारी २ ची देण्यात आली असल्याने खेड्यापाड्यातील लोकांना या वेळेत शहरात येऊन आपल्या दैनंदिन कामासाठी लागणारा किराणा व इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येत नाही. कारण वेळेची मर्यादा कमी असल्यामुळे ग्राहकांची एकच झुंबड उडते व सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडून एकप्रकारे कोरोनाला आमंत्रण दिले जाते. तरी ही वेळ मागिल काळात ज्या प्रकारे सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ठेवण्यात आली होती. तोच जळगाव पॅटर्न राबविण्यात यावा यामुळे व्यापारी पेठेत गर्दी कमी होईल आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाला मदत होईल अशी मागणी कॉग्रेसने केली आहे.

तसेच नाभिक समाजाच्या उदरनिर्वाहासाठी वंशपरंपरागत एकमेव साधन म्हणजे कटींग सलून परंतु हा व्यवसाय सतत बंद असल्याने हातावर पोट भरणाऱ्या नाभिक समाजावर अन्यायच म्हणावा लागेल. कारण मागील वर्षापासून सततच्या लॉकडाऊनमुळे कटींग सलून व्यवसाय बंद असल्याने उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने कोरोना नियमावली देउन नाभिक समाजाला दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी ही मागणी कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या सह पदाधिकारी यांनी केली असून तसे निवेदन पाचोरा प्रांताधिकारी मा.श्री. राजेंद्रजी कचरे साहेबांना दिले आहे.

यावेळी तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण,जिल्हा उपाध्यक्ष विकास वाघ, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीस मनियार,शहर उपाध्यक्ष गणेश पाटील, जिल्हा युवक उपाध्यक्ष अंबादास गिरी, तालुका युवक अध्यक्ष संदीप पाटील, महिला आघाडीच्या अॅड मनिषा पवार, कुसुम पाटील, शिला सुर्यवंशी, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले,एन एस यु आय चे साई पाटील आदी उपस्थित होते.

याप्रसंगी निवेदनाच्या विषयावर प्रातंअधिकारी मा.श्री. राजेंद्रजी राजेंद्र कचरे साहेब यांनी मागिल जळगाव पॅटर्न कसा योग्य होता यावर सविस्तर चर्चा केली. आपली मागणी योग्य असुन तात्काळ आपल्या मगणीचे निवेदन मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवुन चर्चा करुन लवकरच समस्या कशी सोडवता येईल यावर विचार केला जाईल. त्यातच नाभिक समाजाचे दुकाने मागिल काळातील नियम व अटी शर्ती करून कसे सुरु केले जातील हे देखील जिल्हाधिकारी यांना सांगितले जाईल असे आश्वासित कॉग्रेस शिष्टमंडळाला केले. सदर निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे, महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांना पाठविण्यात आले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

शेतकऱ्यांच्या अडीअडचणी त्वरित सोडवा नाहीतर शिवसेना रस्त्यावर ...

Next Article

मानमोडी शिवारात मजूर महिलेवर जंगली श्वापदाचा हल्ला, ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    कोल्हे गावात स्वच्छालय वाटपाची चौकशी करण्याची मागणी.

    December 1, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    जळगाव जिल्ह्यात २२ मार्चपर्यंत ३७ (१) व (३) कलम लागू.

    March 5, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    जळगाव जिल्ह्यात २५ जूनपर्यंत ३७ (१) (३) कलम जारी.

    June 11, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयवंतराव पाटील यांची नगरदेवळा येथे धावती भेट.

    March 29, 2023
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    लोहारा येथे डॉक्टर सागर दादा गरुड यांच्या वाढदिवसानिमित्ताने मास्क वाटप.

    April 30, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    कुऱ्हाड खुर्द येथे ब्रेक द चेन लॉकडाऊचा फज्जा- ग्रामपंचायतीकडून डोळेझाक.

    May 7, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    मानसिंगकानगर कडे जाणारा मुख्य रस्ता दुरुस्त करा ; स्थानिक राहिवाश्यांचे पालिकेला निवेदन.

  • पाचोरा तालुका.राजकीय

    तात्यासाहेब स्व. आर. ओ. पाटील यांच्या आठवणीत जनसमुदाय गहिवरला.

  • Uncategorizedपाचोरा तालुका.

    वडगाव जोगे येथील पाणीपुरवठा विहिरीचे काम निकृष्ट दर्जाचे, ठेकेदारा विरोधात चक्क सरपंचांची तक्रार

दिनदर्शिका

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज