सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जळगावच्या महिलेकडून अंबे वडगाव येथील प्लॉट धारकांची फसवणूक, पोलीस स्टेशनला तक्रार दाखल.

  • माजी जिल्हापरिषद सदस्य मा. श्री. मधुकर भाऊ काटे लोकमत लोकनायक पुरस्काराने सन्मानित.

  • वरसाडे तांडा येथील २६ वर्षीय तरुणाचा ट्रॅक्टर अपघात दुर्दैवी मृत्यू.

  • शेंदुर्णी शहरात गोळ्या, बिस्किटाच्या दुकानातून प्रतिबंधित गुटख्याची सर्रास विक्री कारवाईची मागणी.

  • जरंडी गावात भरवस्तीत वाहनात गॅस भरण्याचा अड्डा सुरु, मोठ्या अपघाताची शक्यता कारवाईची मागणी.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›पेट्रोल डिझेल गॅस व जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढी विरोधात केंद्र सरकारला शिवसेनेचा अल्टिमेटम.

पेट्रोल डिझेल गॅस व जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढी विरोधात केंद्र सरकारला शिवसेनेचा अल्टिमेटम.

By Satyajeet News
May 25, 2021
166
0
Share:
Post Views: 49
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पत्रकार)
दिनांक~२५/०५/२०१

महाराष्ट्रासह देशात सातत्याने सुरू असलेल्या पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढ तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमतीं कमी कराव्यात या मागणी साठी पाचोरा तालुका शिवसेना व महिला आघाडीच्या वतीने तहसीलदार कैलास चावडे यांना आज मंगळवारी सकाळी ११ वाजता निवेदन देण्यात आले.
कोरोनाच्या संकटामुळे अनेकांच्या नोकरी-धंद्यावर गदा आली असून मोठ्या प्रमाणावर रोजगार बुडाले आहेत, लोकांना संसार कसा चालवावा असा यक्ष प्रश्न पडला आहे.

केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून सतत पेट्रोल – डिझेल, गॅस व जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ सुरूच आहे. यामुळे तेल, दाळी आदी वस्तूंच्या दरवाढीमुळे प्रचंड महागाई वाढलेली आहे. सर्वसामान्य माणसाला जगावं की मरावं असा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.पेट्रोल-डिझेल दरवाढीने शंभरी गाठली आहे.त्यामुळे दळणवळण मागली प्रचंड प्रमाणावर महागाई वाढली. जनतेला स्वस्त व मुबलक जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे हे केंद्रसरकारचे कर्तव्य आहे.मात्र भाजपाप्रणीत मोदी सरकारची नीती हि भांडवलदारांची आहे. त्यांना सर्व सामान्य जनतेशी काही घेणे नाही. जनता मात्र महागाईमुळे होरपळून निघत आहे.

शिवसेना हे कदापि सहन करत नाही.शिवसेना खंबीरपणे जनतेच्या पाठीशी असून मोदी सरकारने महागाई नियंत्रणात न आल्यास मोदी शासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, पेट्रोल डिझेल,गॅस,तेल व डाळींची दरवाढ तातडीने मागे घ्यावी, महागाईला आळा घालावा अन्यथा पाचोरा तालुका शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व होणाऱ्या परिणामांना आपण जबाबदार राहाल आमच्या भावना शासन दरबारी कळवाव्यात असे आवाहन करण्यात आले.

यावेळी शिवसेना शहर प्रमुख किशोर बारावकर, मुकुंद अण्णा बिलदीकर,प्रवीण ब्राह्मणे, हरिभाऊ पाटील,रवींद्र मराठे, टिल्लू आप्पा, विजय भोई यांचेसह शिवसेना महिला आघाडीच्या मंदाताई पाटील, सुनंदा महाजन,उर्मिला शेळके, किरण पाटील, रेखा राजपूत, स्मिता बारवकर यांची उपस्थिती होती.

[भूमी अभिलेख कार्यालयात शिवसेनेची धडक.]

दरम्यान दरवाढ विरोधातील आंदोलना नंतर शिवसेनेचे मुकुंद अण्णा बिलदीकर यांचे नेतृत्वात पदाधिकाऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयात उपअधीक्षक भोये यांची भेट घेत शहर भूमापक स्वर्गीय कुलकर्णी यांचे रिक्त जागेवर अद्याप कोणाचीही नियुक्ती न झाल्याने नाराजी व्यक्त करत तातडीने या पदाचा कार्यभार स्वतंत्र कर्मचाऱ्यांना द्यावा जनतेची कामे रेंगाळू देऊ नका अशी आग्रही मागणी केली अन्यथा आम्हाला शिवसेनास्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला.

तसेच पाचोर शहरातील सुमारे ३५०० अतिक्रमित घरे नावावर करण्यासंदर्भात सुरू असलेली प्रक्रिया संथ गतीने का सुरु आहे असा जाब अधीक्षक भोये यांना विचारला दरम्यान कोरूना परिस्थितीमुळे शासन आदेशामुळे काम थांबले असल्याचे त्यांनी सांगत शासनाचा पुढील आदेश आल्यास तात्काळ मोजणीचे काम पूर्ण करु असे आश्वासन त्यांनी दिले यावेळी मुकुंद अण्णा बिलदीकर, शहर प्रमुख किशोर बारावकर,प्रवीण ब्राह्मणे, नगरपालिका कर्मचारी प्रकाश पवार यांची उपस्थिती होती.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

चारचाकीच्या अपघातात पत्नीचा मृत्यू पती मात्र सुखरूप, ...

Next Article

शेंदूर्णी रासेयो एकक व प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    नीलगाय दुचाकीवर धडकल्याने कोकडी तांडा येथील दोन जखमी.

    July 24, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorizedसांस्कृतिक

    पाचोरा परिसर गुर्जर समाजातर्फे सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी.

    November 3, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    वरखेडी येथील गुरांचा बाजार पुढील आदेश येईपर्यंत बंद , पशुधन पालक व व्यापाऱ्याकडून सहकार्याची आपेक्षा.

    October 5, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedक्राईम जगत

    ऐकावे ते नवलच, कुऱ्हाड गावात पोलिसांवर पाळत ठेवण्यासाठी, अवैधधंदे करणारांनी रस्त्या,रस्त्यावर ठेवले खबरी.

    October 11, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    जळगाव जिल्ह्यात आज १२२३ कोरोना बाधित रुग्ण आढळले तर १३ बाधितांचा मृत्यू.

    March 24, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedविविध यश, निवड.

    शेंदुर्णी येथील गरुड महाविद्यालयाच्या सेजल बोरकरचे गीत गायन स्पर्धांमध्ये तिहेरी यश.

    September 22, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • आपलं जळगाव

    पाचोरा येथे पोलीस निरीक्षक नजन पाटील यांनी स्वीकारला पदभार

  • आपलं जळगाव

    जळगाव जिल्हा गोशाळा महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. बन्सीलाल दुगड तर सचिवपदी दिपक पाटील.

  • पाचोरा तालुका.

    संघर्षमय जीवन जगणाऱ्या कै.‌ वैशाली देवरे यांना लासुरे ग्रामस्थांनी दिला अखेरचा निरोप.

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज