पो. कॉ. ईश्वर देशमुख यांची जळगाव येथे बदली, पहूर पोलीस स्टेशनकडून निरोप समारंभ संपन्न.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/१२/२०२२

पोलीस म्हटल म्हणजे सज्जनांचा मित्र तर दुर्जनांना वठणीवर आणण्यासाठी एकमेव पर्याय खडतर मेहनत केल्यानंतर माणसाला पोलीस होता येते परंतु पोलीस झाल्यानंतर माणूस म्हणून जगतांना कायद्याच्या चौकटीत राहून तारेवरची कसरत करत काम करावे लागते हे कार्य पार पाडत असतांना माणूसपण जपून काम करणाऱ्या पोलिसांना नक्कीच मान, सन्मान मिळतो असाच एक खाकी वर्दीचा शिपाई पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथील ईश्वर रामदास देशमुख यांची आज पहूर पोलीस स्टेशन येथुन जळगाव येथे बदली झाली आहे.

नोकरी व बदली हे समीकरण पक्के असत परंतु आपण आपले काम इमानेइतबारे करतांना सर्वसामान्य जनतेला व वरिष्ठ तसेच सहकाऱ्यांना आपलेसे करुन आपुलकी निर्माण करुन कर्तव्य बजावले तर नक्कीच आपण सगळ्यांना हवेहवेसे वाटतो. अश्याच मनमिळाऊ, सुस्वभावी व कर्तव्यदक्ष पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर रामदास देशमुख यांची पहूर येथून नुकतीच बदली झाली आहे.

यानिमित्ताने ईश्वर देशमुख यांचा निरोप समारंभ नुकताच पार पडला या निरोप समारंभ प्रसंगी पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. श्री. प्रतापराव इंगळे साहेब, उपनिरीक्षक मा. श्री. बनसोडे साहेब, मा. श्री. दिलीप पाटील साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंडे साहेब, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर भाकरे, अनिल राठोड, गोपाल गायकवाड, जीवण चव्हाण, हंसराज मोरे, नवल हटकर, प्रकाश पाटील, अमोल कुमावत सर्व कर्मचारी व सहकारी वृंद यांनी ईश्वर देशमुख यांना पुष्पगुच्छ देऊन फुलांचा वर्षाव करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आदरपूर्वक निरोप दिला.

मला माझे वरिष्ठ अधिकारी मा. श्री. प्रतापराव इंगळे साहेब व इतर वरिष्ठ अधिकारी यांनी मला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केले व माझ्या सहकारी मित्रांनी मला वेळोवेळी योग्य मदत केली व जी आपुलकीची वागणूक दिली हिच एक उर्जा बनून मी कार्य करत राहिलो नोकरी असली म्हणजे बदली असतेच परंतु पहूर पोलीस स्टेशनला काम करतांना मला मी एका परिवारासोबत असल्यासारखे वाटत होते. मला केलेले मार्गदर्शन व सहकार्य व दिलेले प्रेम हे शब्दात व्यक्त करण्यासारखे नाही असे मत व्यक्त केले.

ब्रेकिंग बातम्या