सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भोजे येथील सावता सॉमिल व संबंधित चौकशी अधिकाऱ्यांविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते निलेश उभाळे यांची तक्रार.

  • लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांकडून माहिती देण्यास टाळाटाळ.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला जीवघेणा हल्ला.

  • शेतकऱ्यावर कोसळले अस्मानी संकट, सार्वे पिंप्री शिवारात विज पडून तीन गायी ठार.

  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

क्राईम जगत
Home›क्राईम जगत›सैन्य भरतीचे स्वप्न दाखवून लाखोंचा गंडा घालणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानास अटक ( पाचोरा पोलिसांचे यश)

सैन्य भरतीचे स्वप्न दाखवून लाखोंचा गंडा घालणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानास अटक ( पाचोरा पोलिसांचे यश)

By Satyajeet News
November 29, 2020
232
0
Share:
Post Views: 56
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा )
दिनांक~२९/११/२०२०
पाचोरा तालुक्यातील तरुणांसह राज्यातील सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना सैन्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत लाखोंची फसवणूक करून फरार झालेला केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सहाय्यक उपनिरीक्षक असलेल्या जवानास पाचोरा पोलिसांनी नाशिक येथून मोठ्या शिताफीने अटक केली आहे. आरोपीस पाच दिवसांचा पोलिस कोठडी मिळाली आहे.
पोलिसांनी अटक केलेला आरोपी रमेश ईश्वर बागुल (वय- ५०) हा नगरदेवळा ता. पाचोरा येथील मूळ रहिवासी आहे. तो हल्ली विलासपूर (छत्तीसगढ) येथे केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत आहे. त्याने नगरदेवळा येथे सुट्टीवर आल्यानंतर सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना संपर्क करत सैन्य दलात नोकरी लावण्याचे आश्वासन देत नगरदेवळा, धुळे, नाशिक, अहमदनगर आदी ठिकाणच्या सुमारे २२ तरुणांकडून सुमारे ६० लाख रुपयांची माया गोळा केले होती. काही दिवसांच्या प्रतिक्षेनंतही नोकरी लागत नसल्याचे लक्षात आल्याने नगरदेवळा येथील रवींद्र पाटील या तरुणाने पाचोरा पोलिसात गुरन.३६८/२०२० आयपीसी कलम ४२०,३४प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे, पोलीस निरीक्षक किसनराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विकास पाटील, नाईक राहुल सोनवणे, विश्वास देशमुख, विनोद बेलदार, किरण पाटील, तांत्रिक शाखेचे वारुळे यांच्या मदतीने आरोपीला नागपूर व नाशिक येथे तपास करत केवळ नावा शिवाय इतर कुठलिही माहिती नसतांना सलग पाच दिवस कठोर परिश्रम घेत आरोपीला नाशिक येथुन अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले असून या फसवणुकीत कोणा कोणाचा सहभाग आहे याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील करीत आहेत. दरम्यान, सुशील मगरे यास जामनेर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायमूर्ती कुलकर्णी यांनी त्यास १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे . यावेळी सरकारी पक्षातर्फे अॅड अनिल सारस्वत यांनी युक्तिवाद केला.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

दिव्यांग सेने मार्फत ३ डिसेंबरला जळगाव येथे ...

Next Article

निळकंठ पाटील लिखीत बेसिक इंग्लिश कोर्स (भाग-1) ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • क्राईम जगत

    लोहारा येथे धनदांडग्याची विद्यूतचोरी उघड

    October 21, 2020
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    बनावट कागदपत्रे बनवून महानुभाव आश्रम, मंदिर व मालमत्ता हडप करण्याच्या कटातील पाचही संशयित आरोपींना पोलीसांनी घेतले ताब्यात.पिंपळगाव हरेश्र्वर पोलीसांची ...

    August 20, 2022
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    विवाहितेच्या खूनप्रकरणी ३ अटकेत आरोपी पतीसह चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल.

    February 6, 2022
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला जमा असलेल्या हरवलेल्या मोटार सायकल वाहना मध्ये तुमचे वाहन नाही ना? याबाबत खात्री करा नाही तर ...

    April 10, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    पंढरपूर येथील अट्टल गुन्हेगाराला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक.

    September 23, 2024
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या धडाकेबाज कारवाईने अवैधधंदे करणारांचे धाबे दणाणले.

    October 4, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • आपलं जळगाव

    भाजपाचा भव्य किसान मोर्चा सामील व्हा

  • Uncategorized

    शेंदुर्णी येथील गरुड महाविद्यालयात विविध स्पर्धा उत्साहात संपन्न.

  • Uncategorized

    अंबे वडगाव येथील सांड गायीचा सर्पदंशाने मृत्यू, गाव परिसरातून हळहळ.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज