बजरंग दल कार्यकर्ताच्या सतर्कतेमुळे कत्तलखान्यात जाणारी गुरे बचावली.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०५/२०२१
दिनांक २५ मे मंगळवार रोजी पाचोरा तालुक्यातील वरखेडी गावाजवळ ५ गाई व वासरांची अवैधरित्या वाहतूक करत असताना बजरंग दलाचे कार्यकर्ते जळगाव जिल्हा सहसंयोजक श्री.अतुल दिलीप पाटील गोराडखेडे,श्री.शुभम नंदकिशोर तेली,श्री.सूरज संजय सपकाळ,श्री.सचिन अशोक चौधरी,यांचे निदर्शनास आले.
गुरे वाहतूक करणाऱ्या गाडीत पाहिले असता त्या गाडीत प्रमाणापेक्षा जस्त गुरे आढळून आली.तसेच गाडीच्या क्षमतेपेक्षा व गुरांची संख्या जास्त असल्याने गुरांचे होणारे हाल पाहून ती गुरे भाकड असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी गाडीचालक अय्युब युसुप शेख,रा.बाहेरपुरा पाचोरा याला विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्यावर सदर गौरक्ष यांचा संशय बळावल्यावर अतुल पाटील यांनी लोहारा येथील बजरंग दल कार्यकर्ते श्री.हेमंत गणेश गुरव यांचेशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला व सदर विषयाची माहिती देत हेमंत गुरव यांनी स्थानिक पोलीस स्टेशन असलेले पिंपळगाव(हरे) येथे संपर्क साधण्याचे सांगितले व कायदेशीर पुढील नियमाप्रमाणे कार्यवाही करणेसाठी गाडी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्याचे सुचविलेवर गाडी पोलीस स्टेशनमध्ये जमा करून सदर गौ.वंश गौ.शाळा येथे सोडण्यात आले.
या घटनेची माहिती पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला मिळताच पोलीस कॉन्स्टेबल श्री.संदीप बजरंग राजपूत यांनी सरकार तर्फे फिर्यादी होऊन गु.र.नं.०१४४/२०२१ दि.२५/०५/२०२१ रोजी रात्री प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चेक कलम ११(१)(ड), मोटार वाहन अधिनियम १९९८८ चे कलम ८३, मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १७७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात करण्यात आला आहे.
छोटा हत्ती मोटार क्र. एम.एच ०४,ए,क्यू,५८३९ नंबरचे वाहन व गुरे पोलिसांनी जप्त केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पिंपळगाव(हरे) पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ.नीताजी मो.कायटे यांचे मार्गदर्शनाखाली हेड कोन्स्टेबल श्री.रामेश्वर कौतीक पाटील हे करीत आहे. अशी सविस्तर माहिती बजरंग दलाचे कार्यकर्ते हेमंत गणेश गुरव यांनी दिली.