सिंधुदुर्गनगरी :-

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवार दि.16 फेब्रुवारी 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार, दि. 16 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10.30 वा. चिपी जि. सिंधुदुर्ग विमानतळ येथे आगमन व मोटारीने, टेलिफोन एक्स्चेंज ऑफीसजवळ, वेंगुर्ला जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे 17 वे त्रैवार्षिक अधिवेशन व शिक्षण परिषद. स्थळ. टेलिफोन एक्स्चेंज ऑफीसजवळ, वेंगुर्ला आगमन व कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12 वाजता मोटारीने वेंगुर्ला बंदरकडे प्रयाण. दुपारी 12.10 वाजता वेंगुर्ला बंदर येथे आगमन. दुपारी 12.15 वाजता वेंगुर्ला बंदर येथील झुलत्या पूलाचा व निशांत तलाव टप्पा-2 चा लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. स्थळ. वेंगुर्ला बंदर जि.सिंधुदुर्ग. दुपारी 12.45 ते 1.05वाजता राखीव. दुपारी 1.05 वाजता मोटारीने चिपी जि. सिंधुदुर्ग विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 1.35 वाजता चिपी जि. सिंधुदुर्ग विमानतळ येथे आगमन व विमाने जळगावकडे प्रयाण करणार आहेत.