माजी ग्रामपंचायत सदस्य संदीप मांजरेकर यांचे निधन
कुडाळ
कुडाळ कुंभारवाडी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य संदीप मांजरेकर यांचे अल्पशा आजाराने गोवा बांबोळी येथे निधन झाले. माजी ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया मांजरेकर यांचे ते पती होत तर शिवसेनेचे नगरसेवक उदय मांजरेकर यांचे सख्खे चुलत भाऊ होत.
कुडाळ मधली कुंभारवाडी येथील संदीप मांजरेकर हे मंडप डेकोरेशनचा व्यवसाय करत होते. २००७ ते २०१२ या कालावधीत ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत होते. अलीकडे ते आजारी होते ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात त्यांचे उपचार सुरू होते त्यानंतर त्यांना गोवा बांबोळी येथे अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले. दरम्यान आज (बुधवारी) पहाटे २.३० वाजता त्यांचे निधन झाले त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे, दोन भाऊ, भावजया, पुतणे असा परिवार आहे.