बिबवणे येथील श्री गजानन महाराज ध्यान मंदिराचा १२ प्रकट दिन व दत्तात्रय सोहळा सुरू
कुडाळ
बिबवणे – पळसेवाडी येथील श्री गजानन महाराज ध्यान मंदिराचा बारावा प्रकट दिन व दत्तात्रय सोहळा 5 ते 14 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या उत्सव कालावधीत जिल्हास्तरीय भजन स्पर्धेसह धार्मिक व अन्य विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
5 फेब्रुवारी सकाळी 8 वाजता गजानन महाराज पादुकावर दुग्धाभिषेक, 9 वाजता श्री सत्यनारायण महापूजा , दुपारी 12 वाजता महाआरती व महानैवेद्य ,सायंकाळी 4 वाजता स्वामींच्या निर्गुण पादुकांचे सवाद्य शेगावी प्रस्थान,5 वाजता अष्टविनायक महिला भजन मंडळ ( साळेल ) बुवा अंकिता गावडे यांचे भजन, 7 वाजता जिल्हास्तरीय भजन स्पर्धा उद्घाटन, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी, तर उद्घाटक म्हणून गटविकास अधिकारी विजय चव्हाण, मानव अधिकार विभागाचे सचिव अमित वेंगुर्लेकर ,जिल्हा आयुष्य अधिकारी कृपा गावडे, 6 रोजी सकाळी 8 वाजता सत्यनारायण महापूजा ,दुपारी 12 वाजता आरती व महाप्रसाद सायंकाळी 4 वाजता रामकृष्ण मंडळ ( कसाल )यांचे भजन ,7.30 वाजता नियमित भजन स्पर्धा, 7 रोजी सकाळी 8 वाजता सत्यनारायण महापूजा ,दुपारी 12 वाजता आरती व महाप्रसाद ,सायंकाळी 4 वाजता मंगलमूर्ती मंडळ (निरवडे ) यांचे भजन ,7.30 वाजता नियमित भजन स्पर्धा, 8 रोजी सकाळी 8 वाजता सत्यनारायण महापूजा ,दुपारी 12 वाजता आरती व महाप्रसाद ,सायंकाळीं 4 वाजता कीर्तनकार अरुण सावंत (वेंगुर्ले ) यांचे कीर्तन ,7.30 वाजता नियमित भजन स्पर्धा, 9 रोजी सकाळी 8 वाजता सत्यनारायण महापूजा, 11 वाजता श्री ची पालखी प्रदक्षिणा (श्री देव गिरोबा मंदिर ते श्री गजानन महाराज मंदिरापर्यंत ) ,रात्री 8 वाजता श्री देव रवळनाथ पावणाई मंडळ ( कुंदे) यांचा हरिपाठ ,10 वाजता समर्थ मंडळ ( कट्टा ) बुवा आनंद आचरेकर यांचे भजन, 10 रोजी सकाळी वाजता गजानन महाराज पोथी पारायण व सामुहिक नामस्मरण, दुपारी 12 वाजता आरती व महाप्रसाद ,3 वाजता विठ्ठल रखुमाई मंडळ ( धामापूर ,चंदगड ) यांचे भजन, सायंकाळी 6.30 वाजता सद्गुरू मंडळ (कुडाळ ) बुवा वैभव सावंत यांचे भजन, रात्री 8 वाजता कीर्तनकार महेश भादवडकर महाराज (आजरा – कोल्हापूर ) यांचे कीर्तन, 11 रोजी सकाळी 8 वाजता दत्तयाग प्रारंभ,दुपारी 1 वाजता आरती व महाप्रसाद, 3 वाजता हळदीकुंकू व फुगडी ,सायंकाळी 6.30 वाजता संत बाळूमामा प्रतिष्ठान मंडळ ( सरंबळ ) यांचे भजन, रात्री 9 वाजता ज्ञानदेव तुकाराम वारकरी सेवा मंडळ ( नेमळे ) यांचा हरिपाठ,11 वाजता श्रीदेवी जय भवानी ( हुमरमळा – अणाव ) यांचा गोंधळ , 12 रोजी सकाळी 9 वाजता दत्तयाग ,दुपारी 1 वाजता आरती व महाप्रसाद ,सायंकाळी 4 वाजता श्री क्षेत्र मळगाव विठ्ठल रखुमाई गोपाळ बोध स्वामी पालखी सोहळा, 5 वाजता श्री देवी यक्षिणी शिक्षक मित्र मंडळ मंडळ ( माणगाव ) यांचे भजन,7 वाजता कीर्तनकार भगवानदास कोकरे महाराज (चिपळूण ) यांचे कीर्तन, रात्री 9 30 वाजता श्री रामेश्वर मंडळ (कुडाळ) बुवा अनिल पांचाळ यांचे भजन ,13 रोजी प्रकट दिन सोहळा – सकाळी 6 वाजता श्री दत्त पूजा, दत्तयाग समाप्ती, स्वामींच्या मूर्तीवर लघु रुद्राभिषेक दुपारी 1 वाजता आरती व महाप्रसाद ,3 वाजता श्री लक्ष्मी ,शिव भजन मंडळ ( कानूर, गडहिंग्लज – कोल्हापूर ) यांचे सोंगी भजन, रात्री 8ब वाजता इंद्रधनु कलामंच ( दाभोली – वेंगुर्ले ) निर्मित चला आळंदीला नाटक 14 रोजी सकाळी 9 वाजता श्री देव रामपंचायतन अभिषेक, 10 वाजता मुलांचे विविध स्पर्धात्मक कार्यक्रम व बौद्धिक स्पर्धा ,दुपारी 1 वाजता आरती व महाप्रसाद , सायंकाळी 4 वाजता जिल्हास्तरीय भजन स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ ,7 वाजता गोपाळकाला – कीर्तनकार हृदयनाथ गावडे यांचे कीर्तन ,रात्री 9 वाजता मुलांचे विविध गुण दर्शनपर कार्यक्रम व श्री गजाननाच्या लीला नाटिका आदीं कार्यक्रम होणार आहेत.उपस्थित राहण्याचे आवाहन श्री स्वामी प्रतीक्षा भक्ती सेवा मंडळ ( बिबवणे – पळसेवाडी यांनी केले आहे.फोटो गजानन महाराज