*भाजपा पाचोरा तर्फे महावितरणवर हल्लाबोल* आमदारांना सुनावले खडे बोल.

*भाज
दिलिप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०२/२०२१
येथील भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात महावितरणाने वीज पुरवठा खंडित करण्याचा घेतलेला निर्णय त्वरित मागे घ्यावा व अन्य मागण्यांसाठी आज ता.०५ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी १२ वाजता महावितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयावर हल्लाबोल आंदलनाने पाचोरा शहर दणाणून सोडले.
राज्य शासनाच्या वाढीव व अवाजवी बिले सक्तीने वसूल करण्यासाठी वीज जोडणी तोडण्याचा निर्णय विरोधात घोषणा देत पाचोरा भाजपा कार्यालय येथून निघालेला हा मोर्चा वीज वितरण कंपनीच्या गिरड रोडवरील विभागीय कार्यालयावर येऊन धडकला. मोर्चात सहभागी भाजपा कार्यकर्त्यांनी हातात पक्षाचे झेंडे, घोषणांचे फलक, राज्य शासनाचा निषेध करणारे फलक घेत घोषणाबाजी करीत पाचोरा शहर दणाणून सोडले.
राज्यातील लाख वीजग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा जुलमी निर्णय ठाकरे सरकारने त्वरित मागे घ्यावा या प्रमुख मागणीसाठी हे “टाळा ठोक हल्लाबोल आंदोलन” करण्यात आले.
पाचोरा येथील महावितरण कार्यालयावर पोहोचल्यानंतर अमोल भाऊ शिंदे व भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कार्यालय परिसरात जोरदार घोषणाबाजी केली यावेळी महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता श्री दासकर यांनी भाजपा पदाधिकारी यांना सामोरे जाऊन त्यांचे तर्फे निवेदन स्वीकारले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे पाचोरा तालुका अध्यक्ष अमोल भाऊ शिंदे यांनी वीज ग्राहकांच्या वतीने उपस्थित महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसमोर आपले परखड मत व्यक्त केले
वीज बिलाच्या संदर्भात आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने त्रस्त वीज ग्राहकांची बिले जमा करून त्यांना न्याय देण्याबाबत च्या वलग्ना मागील काळात केल्या होत्या परंतु आमदार किशोर पाटील यांनी ग्राहकांच्या वीज बिलाच्या बाबतीत विधानसभेत चकार शब्द काढलेला नाही स्वतः मुंबई येथे पंचतारांकित हॉटेलमध्ये सुखासीन जीवन जगणाऱ्या आमदार किशोर पाटील यांना ग्रामीण भागातील जनतेच्या वेदनांचा कळवळा अजिबात नाही असा घणाघाती हल्ला बोल भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी थेट आमदार किशोर पाटील यांचे वरच केला. भाजपा च्या परखड आणि आक्रमक कृतीने राज्य शासन व महावितरण कंपनीवर हल्लाबोल केला.
यावेळी संतप्त व त्रस्त वीजग्राहक यांनी सुद्धा विद्युत अभियंत्यांच्या समोर आपल्या समस्यांच्या पाढा वाचला.
भाजपा तर्फे देण्यात आलेल्या निवेदनात प्रामुख्याने सक्तीने वीज बिल वसुली थांबवावी, व वीज बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करू नये, तसेच राज्य शासनाने यापूर्वी केलेल्या जाहीर घोषणा प्रमाणे आर्थिक व दुर्बल घटकातील ग्राहकांसाठी ० ते १०० युनिट पर्यंत वीज बिल माफ करावे, शासनाने सरासरी वीज बिलाची दुरुस्ती करून ते हप्त्यात भरण्याची सवलत द्यावी covid-19 च्या संचार बंदी काळातील माहे मार्च ते जून या ४ महिन्यातील किमान ० ते १०० व ० ते ३०० या वर्गातील वीज बिले माफ करावीत, शेती सिंचनासाठी रात्री ऐवजी दिवसाचा वीजपुरवठा देण्यात यावा , ग्रामीण भागातील वारंवार नादुरुस्त होणारे ट्रांसफार्मर 48 तासांच्या आत बदलून मिळावेत, व त्यासाठी लागणारे ऑइल आणि तत्सम देखभाल-दुरुस्ती चे साहित्य मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावेत अशा प्रमुख मागण्या या निवेदनात करण्यात आल्या होत्या.
भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अमोल भाऊ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील हा मोर्चा पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यशस्वी केला.
या आंदोलनात भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांचे समवेत शहराध्यक्ष रमेश वाणी जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे ,बाजार समितीचे माजी सभापती सतीश बापू शिंदे, पंचायत समिती सभापती वसंत गायकवाड,बाजार समिती संचालक नरेंद्र पाटील,नगरसेवक ॲड योगेश पाटील,ऍड गोरक्ष देवरे,सरचिटणीस दीपक माने,भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष मुकेश पाटील, शहराध्यक्ष समाधान मुळे, किरण पांडे,परेश पाटील,भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्षा ज्योतीताई भामरे,डॉ. शांतीलाल तेली, किरण पांडे, प्रदीप पाटील,शहर सरचिटणीस कुमार खेडकर,अनिल पाटील योगेश चौधरी,विजय पाटील, जितेंद्र पाटील,राजेंद्र पाटील, लकी पाटील,प्रमोद पाटील, जगदीश पाटील,गजानन पाटील वीरेंद्र चौधरी,मयूर शेलार,नितेश पाटील,अमोल खैरनार,सुनील पाटील,किशोर पाटील,विलास पाटील यासह भारतीय जनता पार्टी भाजपा महिला आघाडी व भाजयुमोचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.