पाचोऱ्यात दसरा उद्या येऊन ठेपलायं – आणि आपण काहीतरी विसरलोयं सारखं जाणवतयं !
अगदी खरं आहे – जो आनंद आणि मजा,उत्साह,भेटीगाठी व जिव्हाळा – दसरा’विषयी पाचोरा’त नेहमी पाहायला मिळायचा – तो उत्साह आज आपल्यातुन हरवलायं कि कायं ? असं मला फार जाणवतयं ?
मलाचं काय पाचोरा-भडगाव तालुक्यातील प्रत्येक शिवसैनिकांना आणि स्नेहीं’ना त्या वेदना आजही मनाला जाणवतायतं ?
” एकीकडे मुंबई’त शिवसेनेचा दसरा मेळावा आणि दुसरीकडे पाचोरा’त ज्यांनी शिवसेना खऱ्या अर्थाने रूजवली ते बुलंद नेतृत्व तात्यासाहेब आर ओ पाटील यांचा भव्य वाढदिवस…. सर्वसामान्य कार्येकर्तेंच्या सहवासात साजरा करतांना…”
” शिवसैनिक फाटका जरी असला तरी पण तो आपला आहे ” हि भावना दसरा’च्या दिवशी वाढदिवसाच्या भेटीवेळी कार्येकर्तेंमध्ये आपलेपणाने मिठी मारून विश्र्वास देणारे दिलेलाही नेतृत्व तात्यासाहेब आर ओ पाटील हे होते.
आज ती खंत वैशुताई साहेब भरून काढतील का ? हि अतृप्त मनांची उत्कंठा सर्वसामान्य शिवसैनिकांत मनामनात प्रश्न उभं करून भेडसावतं आहे.ताईसाहेब आपण आमचे नेते स्व. तात्यासाहेब आर ओ पाटील यांची दसरा परंपराचा वारसा त्याचं उम्मीदिने व तात्यासाहेब यांची आठवणींची उजळणी म्हणुन पुन्हा एकदा सुरू करणार का ?
तात्यासाहेब आज जरी आपल्यात प्रत्यक्ष नसले तरी ते तुमच्या विचारांत व संस्कारातं जीवंत आहे.पण ते विचार पुन्हा धगधगत्या भगव्या रंगाच्या झेंड्याच्या किरणांमधुन पेट घेतील का ? तो उत्साह आणि ती उम्मीद आणि तो लढा व तो संघर्ष उंच भरारी ( गरूडझेप ) घेणार का ? हा प्रश्र्न तात्यासाहेब समर्थकांना मनांच्या मनांमध्ये पडलेला आहे.
*ताईसाहेब आमचे तात्यासाहेब आज जरी आपल्यात व आमच्यात नसले तरी त्यांचे हजारो समर्थक आजही ताईसाहेब आपल्या आदेशाची वाटं बघतायतं ? तुमची फक्त एक हाकेची वाटं पाहतायतं ?
तुम्ही फक्त हाक द्या ? ते तुम्हाला साथ देण्यासाठी मनाच्या मनामध्ये धडपडतायतं ? आता हि वेळ घरात बसवुन चाललेले राजकारण – आणि – घडणारे घटना मुकाटपणे बघायची वेळ नाही….आता वेळ आली आहे तात्यासाहेबांसारखी जनतेत जाऊन कार्य करण्याची – सेवाभाव व मदत करायची – अडी-अडचणी आणि प्रश्न सोडवायची ! वेळ आली आहे – तात्यासाहेब समर्थकांना जवळ घेऊन पुन्हा लढा उभारायची ?
ते तुम्ही नक्कीचं करू शकतात ? तेवढे सामार्थ्य तुमच्यात आहे हे तुम्ही कोरोना’काळात लाखो रू दान मदतीसाठी करून सर्वांना दाखवुन दिले आहे.
हा आवाज माझा नाही – तात्यासाहेब समर्थकांचा नाही – जनतेचा पण नाही तर अजुन स्वत: तात्यासाहेबांचा आहे.
*अगोदर काहीतरी उद्योग व व्यवसाय करा आणि नंतर राजकारण करा – असे नेहमी तरूणांसह सर्वांना मोलाचा सल्ला व फटकार लावणारे आणि स्पष्टपणे तोंडावर बोलुन मनात कपटी डाव न ठेवणारे व्यक्तीमत्व तात्यासाहेब होते.
पण आता ती उणीव आपण भरून काढणार का ? फक्त तात्यासाहेबांच्या जागेवर आता तुम्ही ताईसाहेब उभे राहुन पुन्हा एकदा नवीन उम्मीद आणि नवीन दिशेने खंबीरपणे – शुभेच्छा सर्वसामान्य शिवसैनिकांच्या स्विकारणार का ? तात्यासाहेब सारखे संघर्षमयी यात्रेवर ताईसाहेब तुम्ही सवार होणार का ? तात्यासाहेबांची शेवटची इच्छा होती ती आता पुर्ण आपण करून दाखवणार का? आम्ही तयार आहोत – ताईसाहेब तुम्ही एक पाऊल आता तरी पुढे टाकणार का ? हा सर्व प्रश्नांचा गोंधळ तात्यासाहेब समर्थक परीवारामधील सर्व सदस्यांना पडलायं !! शेवटचे क्षण तात्यासाहेब सोबत राहण्याचा योग मला लाभला हिच प्रेरणा आजही प्रत्येक कट्टर शिवसैनिकांच्या मनात आजही तशीच जीवंत आहे.
मी व शिवसेना तालुका संपर्कप्रमुख सुनिल पाटीलसाहेब व त्यांचे सारथी गणेशभाऊ आम्ही जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील यांच्या कन्येचे चाळीसगाव येथील लग्न आटपुन सोबत परतत असतांना – आज ही मला त्यांचे गाडीतले शब्द आठवतं आहे – ” जो आए उसके साथ, जो ना आए उसके बगैर – मगर संघर्ष करना छोडना नहीं – चलते रहो – कामयाबी खुद चल के आपके कदमो पे आ पडेंगी ”
तात्यासाहेब तुमचा वाढदिवस जवळुन पाहायचा आनंद व योग माझ्यासह सर्वांना मिळाला – तो आनंद तुम्ही वाढदिवसाच्या दिवशी दिलेले गोड दुधाहुन अधिक गोड होते…. तुम्ही आज जरी आमच्यात नसले तुमचे रूप व स्वरूप आमच्या वैशुताईंच्या रूपाने आज आमच्या जवळ आहे…. फक्त ताईसाहेब – एकदा आपण विचार करा आणि मैदानात उडी घ्या…. राहिलेले स्वप्न व राहिलेला लढा पुन्हा उभारून दिल्लीच्या तख्तावर पोहचवायची इच्छा आजही जळगाव लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांच्या मनात दाटुन आहे….आता सुरूंग लावायची वेळ आहे – तात्यासाहेब म्हटल्याप्रमाणे – ताईसाहेब अब जल्द’ही दिल्ली पहुचना है…. अजयकुमार जैस्वाल🙏🚩🔝
श्री. अजय जैस्वाल .
शिवसेना मिडीया प्रमुख
( पाचोरा )