पाचोरा व जामनेर तालुक्यात विटा भाजण्यासाठी लाकडांचा वापर, वायुप्रदूषणासह निसर्गसंप्तीचा ऱ्हास.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३१/०१/२०२१
पाचोरा व जामनेर तालुक्यातील वीटभट्टी व्यवसाय करणारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून या व्यवसाईकांमध्ये परवाना धारक वीटभट्टी व्यवसाय करणारांची संख्या नगण्य असून अनाधिकृतपणे वीटभट्टी व्यवसाय करणारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते.
यात महत्वाची बाब म्हणजे वीटभट्टीची परवानगी देतांना शासनाकडून विहीत नमुना असलेली निविदा भरुनच नियम व अटींवर परवानगी दिली जाते.
याच वेळी वीटा भाजण्यासाठी कोळशाचा वापर करणे बंधनकारक असल्यावरही वीटभट्टी मालक कमी खर्चात जास्त पैसा कमावण्यासाठी कोळशाचा वापर न करता सरळसरळ लाकडाचा वापर करून वीटा भाजतात.
या गैर प्रकारामुळे आपोआपच लाकडांची मागणी वाढते व वीटभट्टीवाले मालक व लाकूड व्यापारी यांची जुगलबंदी जमल्याने वीटभट्टीवाल्यांना लाकडे पुरवण्यासाठी लाकूड व्यापारी गावशिवारातील शेतकऱ्यांना हाताशी धरून पैश्याचे आमिष दाखवत हिरव्यागार झाडांची दिवसाढवळ्या कत्तल करत आहेत.
एकीकडे या अवैध वृक्ष तोडीमुळे पाचोरा व जामनेर तालुक्यातील शेतशिवारात शेकडोंच्या संख्येने हिरव्यागार झाडांची कत्तल सुरु असून निसर्गसंप्तीचा झपाट्याने ऱ्हास होत आहे.
तर दुसरीकडे शासन निसर्गसंप्तीचे रक्षणासाठी दरवर्षी लाखोरुपये खर्च करत मोठमोठ्या योजना अमलात आणून निसर्गसंप्तीचे जतन व नवीन वृक्ष लागवत करत असते त्यामुळे या सगळ्या शासनाच्या खर्चावर पाणी फिरते.
तरी महसूल व वनविभागाने अनाधिकृत वीटभट्टीवाले शोधून त्यांच्यावर गौणखनीच चोरी तसेच सर्वच वीटभट्टीवाले यांच्यावर लाकूड वापरत असल्याने कारवाई करणे गरजेचे आहे.
अशी कारवाई झाल्यास नक्कीच वीटभट्टीचा व्यवसाय करणारांना लाकूड मिळणार नाही. व आपोआपच ते कोळशाचा वापर करतील असे मत सुज्ञनागरीकातून व्यक्त केले जाते आहे.