जामनेर तालुक्यातील राखीव जंगलात मोठ्याप्रमाणात वृक्षतोड.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०३/२०२२
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुका हा निसर्गसौंदर्याने नटलेला तालुका म्हणून ओळख आहे. परंतु मागील काही वर्षांपासून वनविभागाच्या छुप्या आर्शिवादामुळे जामनेर तालुक्यातील राखीव जंगल, वनीकरण विभाग व खाजगी मालमत्तेच्या हिरव्यागार वृक्षांची दिवसाढवळ्या कत्तल होत आहे.
विशेष म्हणजे जामनेर तालुक्याला वन विभागाचे कार्यालय असून येथे कर्मचारी संख्या पूर्ण आहे. तरीसुद्धा जामनेर तालुक्यातील राखीव जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असून गोद्री परिसरातील राखीव जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होऊन येथील निसर्ग संपत्ती नष्ट होत असून हे राखीव जंगल नष्ट होण्याच्या मार्गावर आहे असे खात्रीलायक वृत्त असून ही होणारी बेसुमार वृक्षतोड त्वरित थांबवून गोद्री जंगल वाचवण्यात यावे अशी मागणी निसर्गप्रेमी वृक्ष प्रेमींनी केली आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.