श्री.गो.से.हायस्कूल, पाचोरा येथे शिक्षकांची कोविड चाचणी

दिलीप जैन. ( पाचोरा ) श्री.गो.से.हायस्कूल, पाचोरा येथे शिक्षकांची कोविड चाचणी :दिनांक २३/१०/२०२० शुक्रवारी सकाळी १० ते १२ वाजेच्या दरम्यान श्री.गो.से.हायस्कुल, पाचोरा येथे मा. शोभा बाविस्कर, मुख्याधिकारी नगरपालिका पाचोरा, डॉ.अमित सांळुखे, ग्रामीण रुग्णालयात पाचोरा, यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड चाचणी घेण्यात आली. मुख्याध्यापक,श्री.सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका सौ.प्रमिला वाघ,
पर्यवेक्षक श्री.आर.एल.पाटील,सकाळसत्र,दुपारसत्र, टेक्निकल, एमसीव्हीसी चे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी बंधू यांची रॅपिड अॅन्टीजन कोविड १९ चाचणी घेण्यात आली.परमेश्वर कृपेने सर्वांची चाचणी निगेटिव्ह आली असून, सर्वांनी आनंद व्यक्त केला.कोविड १९ च्या पथकात श्री.गजानन काकडे, आरोग्य सहाय्यक, भोसले आप्पा प्र.अधिकारी,भुषण काटे,आकाश खैरनार यांनी सर्व शिक्षक, शिक्षिका यांचे मनोधैर्य वाढवून चाचणीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण केले.शाळेच्यावतीने चाचणी पथकातील सर्वांचे आभार मानले आहेत.