नीलगाय दुचाकीवर धडकल्याने कोकडी तांडा येथील दोन जखमी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०७/२०२२
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथुन जवळच असलेल्या कोकडी तांडा येथील दोन इसम दिनांक २३ जूलै २०२२ शनिवार रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शेंदुर्णी येथून अंबे वडगाव येत असतांना जामनेर, पाचोरा रस्त्यावर मालखेडा ते अंबे वडगाव दरम्यान असलेल्या राखीव जंगल परिसरातून जात असतांनाच त्यांच्या स्वयंचलीत दुचाकी समोर एक नीलगाय अचानकपणे धावून येत यांच्या दुचाकीवर आदळल्याने अपघात होऊन या अपघातात दुचाकी वरील दोघ इसम जबर जखम झाले असून पैकी एकाच्या हाताचे हाड (फॉक्चर) मोडले आहे. तसेच दुचाकीची मोडतोड होऊन नुकसान झाले आहे.
(देवदूत बनून आले पोलीस विनोद पाटील)
हा अपघात घडला तेव्हा योगायोगाने पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद पाटील हे शेंदुर्णी कडून पाचोरा जात असतांना त्यांना हे अपघातग्रस्त रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले याच ठिकाणी काही इसम जमलेले होते परंतु मदत करण्याऐवजी फोटो काढण्यात मग्न दिसून आल्याने त्यांनी क्षणाचाही विलंब न करता गाडीतून खाली उतरुन अन्य दोन जणांच्या मदतीने जखमींना स्वताच्या गाडीत टाकून पाचोरा येथील विघ्नहर्ता या दवाखान्यात दाखल केले. जखमींना रुग्णालयात पोहचवण्यासाठी पोलीस विनोद पाटील यांनी मदत केल्यामुळे पुढील अनर्थ टळला व जखमींना जीवदान मिळाले कारण या जखमींपैकी एकाच्या डोक्यला जबर मार लागला असून जास्त प्रमाणात रक्तस्त्राव झाला होत होता जर दवाखान्यात जाण्यासाठी उशीर झाला असता तर जखमींच्या जीविताला धोका होण्याची दाट शक्यता नाकारता येत नव्हती.
याबाबत सविस्तर वृत्त असे की अंबे वडगाव येथुन जवळच असलेल्या कोकडी तांडा येथील सुभाष मोरसिंग राठोड व ताराचंद थावरु राठोड हे काही कामानिमित्त शेंदुर्णी गेले होते. काम आटोपल्यावर ते सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शेंदुर्णी येथून कोकडी तांडा येथे येत असतांना जामनेर ते पाचोरा रस्त्यावर मालखेडा ते अंबे वडगाव दरम्यान असलेल्या राखीव जंगल परिसरातून येत असतांनाच त्यांच्या दुचाकी समोर अचानकपणे एक नीलगाय (रोही) भरधाव वेगाने पळत येऊन धडकली दुचाकीस्वारांना काही कळण्याच्या आतच क्षणार्धात दुचाकी व दुचाकीवरील दोघे जोराने दुर फेकले गेले. या अपघातात दोघांनाही जबरदस्त मार लागुन ते जबर जखमी झाले आहेत तर एकाच्या हाताचे हाड फॉक्चर मोडले असल्याने या दोघांनाही तातडीने पाचोरा येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
वनविभागाचा गलथान कारभार ~
ज्या, ज्या परिसरातील वापराच्या रस्त्यावर किंवा राखीव जंगलात जर बिबट्या, तडस, रानडुक्कर, नीलगाय, हरण किंवा इतर प्राणी असतील तर त्यांच्या व या परिसरातून वावरणाऱ्या लोकांच्या जीवीताचे सुरक्षिततेसाठी ठिकठिकाणी सुचना (माहिती) फलक लावणे बंधनकारक आहे. तसेच जंगली प्राण्यांची शिकार होणार नाही याची काळजी घेण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. परंतु पाचोरा व जामनेर वनविभागाकडून राखीव जंगलासह राखीव जंगल परिसरातून जाणाऱ्या वहिवाटी रस्त्यावर कोणतेही सुचना फलक लावण्यात आलेले नसल्याने या परिसरातील रस्त्यांवर वाहनधारक आपली वाहने सुसाट वेगाने पळवतात व यातूनच वारंवार असे अपघात होत आहेत. तरी वनविभागाने राखीव जंगल परिसरातून जाणाऱ्या वहिवाटी रस्त्यावर सावधानतेचा इशारा देत (या परिसरातून वाहन चालवताना जंगली प्राण्यांच्या किंवा स्वताच्या जीविताला धोका होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी) वाहने हळु चालवा, जंगली प्राण्यांपासून सावधान असे सुचना (मार्गदरशक) फलक लावणे तसेच वहिवाटी रस्त्यावर राखीव जंगल परिसरात सुरक्षा जाळी लावणे बंधनकारक आहे. असे मत सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले असून त्वरित फलक लावण्यात यावेत अशी मागणी केली आहे