अंबे वडगाव येथील जिल्हापरिषद शाळेच्या शिक्षकांचा आगळावेगळा उपक्रम.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/११/२०२०
आज कोरोना साथीच्या जीवघेण्या आजारामुळे जवळजवळ आठ महिन्यांपासून शाळेतील मुले शिक्षणापासून वंचित आहेत गुरुजनवर्ग ईच्छा असूनही शाळा ओस पडल्या आहेत यावर नक्की काय तोडगा निघेल यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न चालू आहेत. आमच्या गावातील म्हणजेच अंबे वडगाव तालुका पाचोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीचे ८५ विद्यार्थीदेखील शाळा उघडण्याची वाट बघत आहेत.
या शाळेत सौ. चंद्रप्रभाताई सोनवणे, दिनेश पाटील ,राजू पटेल व सौ. वृषाली सोनार या शिक्षकांची नियुक्ती आहे. अंबे वडगाव हे खेडेगाव या गावातील विद्यार्थ्यांचे पालक शेतकरी व शेतमजूर असून यांना परिस्थीतीनुसार ऑनलाईन शिक्षणासाठी आपल्या मुलांना मोबाईल घेऊन देणे व रिचार्ज करणे हि खर्चिक बाब असल्याने यांचे शैक्षणिक नुकसान होऊनये म्हणून शिक्षकांनी वेगवेगळ्या मार्गांनी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न चालू केला आहे.
इयत्ता पहिलीच्या राजू पटेल यांनी विद्यार्थ्यांना स्वखर्चाने गिरवण पाट्या व झेरॉक्स करून अक्षरे गिरवणे असा विविधांगी तसेच मोबाईल व्हाट्सएपच्या माध्यमातून हजारो रुपये खर्च करून विद्यार्थ्यांना शिक्षणाची उणीव भासू दिली नाही.
तसेच इयत्ता दुसरीचे वर्गशिक्षक दिनेश पाटील सर यांनी सुंदर हस्ताक्षर बाराखडी इंग्रजी A B C D अक्षरे व स्पेलिंग असा विविधांगी तसेच मोबाईल व्हाट्सएपच्या माध्यमातून हजारो रुपये खर्च करून विद्यार्थ्यांना शिक्षणाची उणीव भासू दिली नाही.
इयत्ता तिसरीच्या कौशल्यपूर्ण शिक्षिका सौ. वृषाली सोनार यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे चार्ट व प्रश्नपत्रिका स्वखर्चाने वाटप केले व मोबाईलच्या माध्यमातून तसेच विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन अभ्यास घेत आहेत .
इयत्ता चौथीच्या वर्गशिक्षिका व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. चंद्रप्रभाताई सोनवणे यांनी सर्व शिक्षकांना प्रेरणा देऊन इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना गणित इंग्रजी मराठी वाचन साठी स्वखर्चाने झेरॉक्स उपलब्ध करून दिल्या .असेच कार्य संपूर्ण तालुक्यातील जि प शिक्षक बांधव करीत आहेत. या शैक्षणिक कार्यासाठी शिक्षकांना विस्तार अधिकारी श्रीमती गायकवाड मॅडम तसेच मा. गटशिक्षणाधिकारी विकास पाटील साहेबांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.
अशा उत्तम कार्य करणाऱ्या अंबे वडगाव येथील जिल्हापरिषद शाळेतील शिक्षकांचे कार्य हे उल्लेखनीय असून समस्त वडगाव आंबे येथील ग्रामस्थांकडून शिक्षकांचे कौतुक होत आहेत.