पाचोरा पंचायत समितीच्या कार्यालयाचा स्लॅब कोसळला; गटविकास अधिकारी बालंबाल बचावले.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०७/२०२२
पाचोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अतुल पाटील हे आपल्या कार्यालायत नेहमीप्रमाणे कामकाज करीत असताना अचानक छताचा स्लॅब कोसळल्याची घटना नुकतीच घडली असून यात मा. श्री. अतुल पाटील यांच्या उजव्या हाताला किरकोळ मार लागल्याने या दुर्घटनेत ते बालंबाल बचावले. पाचोरा पंचायत समितीची स्थापना ही १ मे १९६२ रोजी झाली असून या इमारतीला तब्बल ६० वर्षे पूर्ण झाली आहेत. इमारत जीर्ण झाली असून या ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात आला असल्याचे चित्र आहे.
कारण या इमारतीचा छताचा स्लॅब हा अधिकतर ठिकाणी जीर्ण झाला असून गटविकास अधिकारी हे आपल्या कार्यालयात न बसता बाजूलाच असलेल्या सभापती कार्यालयात बसून कामकाज पाहत आहेत. एखादी दुर्घटना झाल्यास यास जवाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत असून वारंवार रंगरंगोटी करून या जीर्ण इमारतीला सजवले जात असले तरी ही ६० वर्षे जुनी इमारत जीवघेणी ठरु नये हीच अपेक्षा.