शिवजयंती निमित्त पाचोरा येथे उद्या भव्य रक्तदान शिबिर.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०२/२०२१
भारत विकास परिषद शाखा पाचोरा तर्फे शिवजयंती निमित्त उद्या १९ फेब्रुवारी रोजी येथील भडगांव रोडवरील प्रसिद्ध संजीवनी हॉस्पीटलमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर रक्तदान शिबिर मध्ये सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत दरम्यान राहणार असून जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान करावे असे आवाहन संजीवनी हॉस्पिटलचे संचालक डॉ. पवनसिंग पाटील, भारत विकास परिषदेचे तालुका अध्यक्ष डॉ. प्रितेश संकलेचा, उपाध्यक्ष डॉ. अतुल पाटील, सचिव संदिप पाटील, सहसचिव नितीन सोनवणे, कोषाध्यक्ष डॉ. हर्षल देव, महिला समन्वयक अंजली गवांदे, प्रोग्राम डायरेक्टर सतिष जाधव, डॉ. संजय जाधव यांचे सह आयोजकांनी केले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.