ओबीसी आरक्षण वाचण्यासाठी महात्मा फुले समता परिषद व ओबीसी समाजाच्या संघटनांनी दिले निवेदन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/११/२०२०
भडगाव येथे महात्मा फुले समता परिषद व विविध ओबीसी समाजाच्या संघटनांच्या वतीने आज दिनांक २७ नोव्हेंबर रोजी भडगाव तालुक्यातील सर्व ओबीसी समाज बांधवांनी भडगाव तहसीलदारांना निवेदन दिले सदर निवेदनात,
१) ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयात वकील नियुक्त करावे.
२) ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे.
३) ओ. बी. सी. आरक्षणात कोणताही फेर बदल करू नये व आरक्षणाची टक्केवारी कमी करू नये.
४) ओ. बी. सी. संवर्गातील संख्या वाढल्याने आरक्षणात टक्केवारीची वाढ करण्यात यावी.
५) ओ. बी. सी. संवर्गाला शासकीय नोकऱ्यांमध्ये पदोन्नती देण्यात यावी.
६) शैक्षणीक क्षेत्रात ओ.बी. सी. संवर्गातील विद्यार्थ्यांना पूर्ण १००% फी माफीच्या सवलती लागू करण्यात यावी.
७) ओ.बी.सी. संवर्गातील जनगणना करण्यात यावी.
८) ओ. बी. सी. महामंडळाचा संख्येनुसार निधी वाढवून देण्यात यावा.
९) नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राची उत्पनांची मर्यादा वाढवावी.
याप्रसंगी महाराष्ट्र माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्री. शालिग्राम मालकर, डॉ. उत्तमराव महाजन, ॲड. वैशाली महाजन ( महाराष्ट्र माळी महासंघ महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा), सौ. प्रेरणाताई महाजन (समता परिषद महिला जिल्हाध्यक्ष), सौ. आरती शिंपी , श्री. भानुदास महाजन( समता परिषद तालुका अध्यक्ष) , महाराष्ट्र माळी महासंघ जिल्हाध्यक्ष श्री. शामराव पाटील, निरीक्षक श्री. दिनेश पाटील, भगवान महाजन, राजेंद्र महाजन, संजय भिकनराव महाजन, प्रदीप महाजन, निलेश मालपुरे, संजय पवार, मनोहर चौधरी ,सुभाष ठाकरे , संतोष महाजन ,संतोष पाटील, प्रकाश महाजन (माळी पंचमंडळ अध्यक्ष), आनंदा महाजन ,विक्रम सोनवणे, महेश महाजन, अशोक महाजन ,दिलीप महाजन ,दगडू महाजन, नंदलाल आढाव, विनोद शिवराम महाजन, मनोज कौतिक महाजन, चिंधू मोकळ, माळी पंचमंडळ पाचोरा समाज अध्यक्ष ,संतोष परदेशी समता परिषद पाचोरा तालुका अध्यक्ष, प्रवीण महाजन, संजय महाले पंढरीनाथ बोरसे, शशिकांत महाजन, रमेश महाजन, कैलास जगन्नाथ माळी, अरुण महाजन, गोरख वेळीस, विजय सुखदेव माळी, शशिकांत देवचंद महाजन, आबा निंबा महाजन, संजय भिकनराव महाजन, राजाराम सुखदेव महाजन, प्रकाश शिवराम महाजन, दत्तात्रय रघुनाथ महाजन, गौरव महाजन (युवक जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र माळी महासंघ), मनोज खैरनार, गुलाब महाजन, दत्तू माळी, रामलाल महाजन, अनिल महाजन, नीलेश महाले, डी के मोरे, अशोक महाजन, विठ्ठल बारकू पाटील, रमेश आनंदा महाजन, आदी उपस्थित होते.