लोहारा जिल्हा परिषद मराठी मुलांची केंद्रशाळेच्या बांधकामसंदर्भात माजी मंत्री आमदार गिरीष भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने आज जिल्हाधिकारी श्री.अभिजीत राऊत यांना निवेदन .
दिलीप जैन. (पाचोरा)
लोहारा जिल्हा परिषद मराठी मुलांची केंद्रशाळेच्या बांधकामसंदर्भात माजी मंत्री आमदार गिरीष भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने आज जिल्हाधिकारी श्री.अभिजीत राऊत यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपा पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे उपस्थित होते.
लोहारा शाळा ही जीर्ण व धोकादायक झाल्याने शासनाच्या आदेशानुसार जमीनदोस्त करण्यात आली.त्यामुळे तत्कालीन शासनाने लोहारा शाळेच्या बांधकामास आमदार गिरीष भाऊ महाजन निधीतून २५-१५अंतर्गत ६०लाख रुपये मंजूर केले होते मात्र हल्लीच्या महाविकास आघाडी सरकार ने त्यास स्थगिती दिली आहे.
शासन शाळा सुरू करण्याच्या विचाराधीन असल्याने आज रोजी लोहारा शाळेला वर्गखोल्या नसल्याने तात्काळ लोहारा शाळेसाठी १० वर्गखोल्या बांधकामास मंजुरी देण्यात यावी,अशी मागणी आ. गिरीशभाऊ महाजन व शाळा व्यवस्थापन समिती यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत शाळेच्या बांधकामासंदर्भात सर्व माहिती जाणून घेतली .
यावेळी आमदार गिरीशभाऊ महाजन ,भाजपा पाचोरा तालुका अध्यक्ष अमोल शिंदे,लोहारा उपसरपंच कैलास चौधरी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक पवार ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य डॉ. केयुर चौधरी उपस्थित होते.