डॉ. अकील शेख यांना वैद्यकीय क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार जाहीर.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/१२/२०२१
सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था औरंगाबाद व माणुसकी रुग्णसेवा समुह शासकीय रुग्णालय घाटी यांच्या संयुक्त विद्यमाने पाचव्या वर्धापन दिनानिमित्त वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. अकील शेख यांना सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळ्याचे दिनांक ३०-१२-२०२१ गुरुवार रोजी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा *मौलाना आझाद संशोधन केंद्र, टीव्ही सेंटर औरंगाबाद* येथे संपन्न होणार आहे.
माणुसकी समुहाच्या पाचव्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाची रूपरेषा- सकाळी १०:०० वाजता महारक्तदान शिबीर शासकीय रत्त पेढि साठि- ०१:०० वा. मान्यवरांच्या हस्ते सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३१ व्यक्तीचां गुण गौरव या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.त्यापैकी डॉ अकील शेख यांना वैद्यकीय क्षेत्रातील काम -शिफा हॉस्पिटल. पाचोरा- संचालक आहेत,
त्यांना मेडिकल ऑफिसर दहा वर्षाचा अनुभव आहे.डॉक्टर अकील शेख हे नेहमीच गोरगरीब ऍडमिट रूग्णांना मायेची ऊब देत असतात. त्यामधे त्यांना धीर देऊन कमी खर्चामध्ये मध्ये उपचार करीत असतात.. व काही गोरगरीब रुग्णांची मोफत उपचार त्यांनी केले आहे. वेळोवेळी रक्तदान शिबिरे घेणे, रक्त तपासणी शिबिरे घेणे, सामाजिक कार्याबद्दल उत्साह वाढावा यासाठी तरुणांमध्ये प्रयत्न करणे. रुग्णांसाठी रक्ताचे बॅग पुरवणे अशी विविध कार्य करीत असतात.त्यांच्या या कार्याची दखल घेत माणुसकी समुहाचा सेवा गौरव पुरस्कार निवड झाल्या बाबत पत्राद्वारे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक सुमित पंडित यांनी कळविले आहे.ह्या पुरस्काराबद्दल
डॉ. अकील शेख यांचे समाजामध्ये सर्वेत्र कौतुक केले जात आहे.