मा. जिल्हाधिकारी यांचे आदेश येईपर्यंत गुरांचा बाजार बंदच. दिलीप भाऊ वाघ.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/११/२०२२
कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील पाचोरा व भडगाव तालुक्यात व दर गुरवारी वरखेडी तसेच दर सोमवारी नगरदेवळा येथे भरणारे गुरांचे बाजार हे जिल्हा अधिकारी यांच्या दिनांक ६ सप्टेंबर २०२२ मंगळवार रोजीच्या आदेशानुसार लम्पी स्किन डीसीज या साथ रोगाचा प्रादुर्भाव जनावरांमध्ये आढळून आल्याने बंद करण्यात आलेले आहेत.
सदर गुरांचे बाजार चालू करण्यासाठी बाजार समितीने जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयाकडे पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु अद्याप पर्यंत जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयाकडून गुरांचे बाजार चालू करणेबाबत आदेश प्राप्त झालेले नाहीत. तसेच गुरुवार दिनांक १० नोव्हेंबर २०२२ गुरुवार रोजी उपबाजार वरखेडी येथे काही व्यापारी व शेतकरी यांनी गुरे विक्रीसाठी आणली होती.
परंतु लम्पी स्किन डीसीज या साथ रोगाचा जनावरांमध्ये प्रसार होऊ नये व पशुधनाची हानी होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी यांचे गुरांचे बाजार चालू करणे बाबत आदेश प्राप्त होत नाही तो पर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांनी व व्यापाऱ्याने बाजार समितीच्या गुरांच्या बाजारात गुरे व ढोरे विक्रीस आणू नये. असे आवाहन बाजार समितीचे मुख्य प्रशासक तथा माजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ वाघ यांनी केले आहे.
सुचना ~ वरखेडी येथील गुरांच्या बाजारासमोर किंवा आसपासच्या परिसरात कुणीही गुरे जमवून खरेदी, विक्री करण्यासाठीचा प्रयत्न करु नये जेणेकरून पाचोरा, जामनेर रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होईल तसेच मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल याची पशुधन पालक व व्यापाऱ्यांनी नोंद घ्यावी.