अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला कठोर शासन व्हावे. अन्यथा जेलभरो आंदोलन पिडीत मुलीच्या समाजबांधवाचा इशारा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०४/२०२१
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे मागील काही महिन्यापूर्वी एका महिलेच्या मदतीने काही धनदांडग्यानी सतत अत्याचार केल्याने ती गरोदर राहून तिने एका मुलीला जन्म दिला ही निंदनीय घटना ताजी असतांनाच आता पुन्हा एका धनदांडग्या घरातील सुशिक्षित बांधकाम विभागत टेक्नीकल असिस्टंट या पदावर नोकरीला असलेल्या तरुणाने एका अल्पवयीन मुलीच्या अज्ञानतेचा फायदा घेत शारीरिक संबंध ठेवल्याची घटना उघडकीस आल्याने राहूल लक्ष्मण तेली वय (२७) वर्षे याच्या विरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर ९४/२०२१ आय.पी.सी. ३७६ (२), (J) (N) ३५४(१) (एक)(दोन) ३५४ ड (१), ४४८ बालकांचे लैंगिक गुन्ह्यापासून सन २०१२ चे कलम ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पीडितेच्या नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की पिंपळगाव हरेश्वर येथील गोविंदपूरा भागत रहाणारा व बांधकाम विभागात टेक्निकल असिस्टंट विभागात नोकरी करत असलेला आरोपी राहूल लक्ष्मण तेली वय वर्षे (२७) याने त्याच्याच घराजवळील एका अल्पवयीन मुलीशी सलगी साधत तिच्या अज्ञानतेचा फायदा घेत दिनांक १४ फेब्रुवारी २०२१ चे मध्यरात्रीपासून तर दिनांक २२ एप्रिल २०२१ च्या दुपारी १२ वाजून ३० मिनिटाचे सुमारास फिर्यादी मुलीचे घरात तसेच आरोपीने स्वताच्या शेतात नेत बलात्कार केला.तसेच संबंधित अल्पवयीन तरुणीस संबंधित आरोपीकडून सतत त्रास देणे सुरु होते. व याची वाच्यता कुठे केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली जात होती. परंतु दिनांक २२ एप्रिलचे दुपारी अंदाजे साडेबारा विजेच्या सुमारास आरोपीने मुलीचे घरात अल्पवयीन पितेवर बलात्कार केला ते तीला असाह्य झाल्याने तीने घडलेली घटना नातेवाईकांना सांगितल्यानंतर नातेवाईकांनी पिडीतेला घेऊन पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन संबंधित राहूल तेली याच्या विरोधात पिडीत मुलीने रितसर तक्रार दिल्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पहुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मा.श्री.खताळ साहेब करत आहेत.
या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शासन व्हावे अशी मागणी मुलीच्या नातेवाईकांनी केली असून सदर घटनेचा पंचक्रोशीतील जनतेतून तिव्र निषेध करण्यात येत आहे.