मरी माता यात्रोत्सवा निमित्ताने कोल्हे येथे आज जंगी कुस्त्या व लोकनाट्य तमाशाचे आयोजन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०९/२०२३
पाचोरा तालुक्यातील कोल्हे येथे सालाबादप्रमाणे मरी (आई) मातेच्या यात्रोत्सवा निमित्ताने दिनांक १७ सप्टेंबर २०२३ रविवार रोजी जंगी कुस्त्या व लोकनाट्य तमाशा ठेवण्यात आला आहे. या यात्रोत्सवात पाचोरा, भडगाव तालुक्याचे लाडके आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते जंगी कुस्ती आखाडाचे पुजन करण्यात येणार आहे.
तसेच या यात्रोत्सवात मा. उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या जेष्ठ नेत्या सौ. वैशालीताई सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार मा. श्री. दिलीपभाऊ वाघ, भारतीय जनता पक्षाचे जिल्हापरिषद सदस्य मा. श्री. भाऊसो मधुकर काटे, उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेचे मा. श्री. उध्दव भाऊ मराठे, मा. श्री. दिपकसिंग राजपुत, मा. श्री. अमोलभाऊ शिंदे, मा. श्री. ॲड. अभय दादा पाटील, मा. श्री. डॉ. भूषण दादा मगर, मा. श्री. डॉ. निळकंठ पाटील, मा. श्री. अरुणभाऊ पाटील, मा. श्री. रमेशचंदजी बाफना सर, मा. श्री. शालिग्राम मालकर, मा. श्री. शिवाजी परदेशी, मा. श्री. अशोक कृष्णाराव पाटील, मा. श्री. रविभाऊ गीते, मा. श्री. ज्ञानेश्वर भाऊ सोनार, मा. श्री. विजय कडू पाटील, मा. श्री. सचिनदादा सोमवंशी, मा. श्री. डॉ. शांतीलाल तेली, मा. श्री. यशवंत पाटील मा. श्री. ॲड. मंगेश गायकवाड, मा. श्री. मुकेश पाटील, मा. श्री. संदीप भाऊ, पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तरी सर्व भाविक, भक्तांनी या मरी माता आईच्या यात्रोत्सवात जास्तीत, जास्त संख्येने उपस्थित राहून जंगी कुस्त्या व लोकनाट्य तमाशाचा आनंद घ्यावा व यात्रोत्सवाची शोभा वाढवावी अशी विनंती जय माताजी मच्छीमार संस्था कोल्हे व कोल्हे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.