बारा अंकी बारकोड मिळवण्यासाठी हाय, हाय पुरवठा विभागात खेटे घालुन, घालुन दुखायला लागले पाय.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/०९/२०२३
पाचोरा येथील पुरवठा विभागात मागील दोन वर्षांपासून अंदाधुंद कारभार सुरु आहे सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला नवीन रेशनकार्ड मिळवणे, रेशनकार्ड मध्ये नवीन नावे समाविष्ट करणे, नावे कमी करणे, रेशनकार्ड विभक्त करणे महत्त्वाचे म्हणजे बारा अंकी नंबर (बारकोड) मिळवण्यासाठी गरजूंना पुरवठा विभागाच्या उंबरठ्यावर दहा, दहा महिने खेटे मारावे लागतात तरीही गरजू लोकांचे कोणतेही काम होत नाहीत .
तर दुसरीकडे दलालांना हाताशी धरून काम केले तर ते लवकर होते मात्र दलांलामार्फत काम करुन घेण्यासाठी पाचशे रुपयांपासून तर तीन हजार रुपये मोजावे लागतात अशा तक्रारी समोर येत आहेत म्हणून पाचोरा पुरवठा विभागात सुरू असलेल्या सावळ्या गोंधळाची वरिष्ठांनी दखल घेऊन दलालांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे तसेच संपूर्ण तालुक्यात रेशनिंग व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय अशी माहिती समोर येत असून याबाबत सत्यजित न्यूज कडून लवकरच भांडाफोड केला जाणार आहे.