ओझर येथे लागलेल्या आगीत सहालाख रुपये किंमतीचा कडबा जळून खाक .
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/०६/२०२१
पाचोरा तालुक्यातील ओझर येथील भूमिहीन दुग्धव्यवसायीक रमेश बुधा हाटकर यांच्या म्हशीच्या गोठ्याजवळ साठवण करुन ठेवलेला कडबा व भुसाला मंगळवार रात्री ते बुधवार सकाळपर्यंतच्या वेळात अचानकपणे आग लागुन यात अंदाजे सहालाख रुपये किंमतीचा चारा जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की ओझर येथील रहिवासी रमेश बुधा हाटकर हे राहतात यांचा एक मुलगा असून तो ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे. याच्याकडे स्वमालकीची शेत जमीन नसल्यामुळे ते म्हशी पाळून दुग्धव्यवसाय करतात. त्यांच्याकडे एकुण ३५ म्हशी आहेत पैकी काही त्यांच्या मालकीच्या व इतर दुसऱ्याच्या म्हशी सांभाळून राखोळीतून पैसे कमावतात.
आता नुकताच पावसाळा सुरु होणार असल्याने व पाऊस पडला तरी गुराढोरांना चारण्यासाठी जंगल नसल्याने व अजून कमीतकमी दोन महिने गुराढोरांना हिरवा चारा उपलब्ध होणार नसल्याचा अंदाज बांधत या कालावधीत ३५ म्हशींना लागणारा चारा याचा अंदाज काढत तितक्या चाराची साठवणूक करण्यात आली होती.
परंतु दिनांक १५ चे रात्री या साठवणूक केलेल्या चाऱ्याच्या ढीगाऱ्याला अचानक आग लागली ही बाब लक्षात येताच रमेश हाटकर व आसपासच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले तसेच पाचोरा येथील नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाला कळवताच अग्नशामक बंब घटनास्थळी जाऊन आग विझवण्यात आली.
परंतु उन्हाळ्यात चारा कोरडाखाक झाला असल्याने आगीने रुद्र रुप धारण केले होते तसेच परिसरात पाणी उपलब्ध नसल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न पुरेसे नव्हते परंतु अग्निशमन बंब आल्यावर आग आटोक्यात आली परंतु या वेळात दोन हजार रुपये शेकडा किंमतीचा घेतलेला जवळपास सहालाख रुपये किंमतीचा चारा जळून खाक झाल्याचे खात्रीशीर समजून येण असून या आकस्मित संकटात हातावर दुग्धव्यवसाय करणाऱ्या रमेश हाटकर हतबल झाला असून यांना शासनाने मदत करावी अशी मागणी होत आहे.