पारोळा तालुक्यातील टोळी येथील दलित समाजाच्या तरुणीवर अत्याचार करणारांना कठोर शासन व्हावे.अन्यथा तिव्र आंदोलनाचा (लहुजी संघर्ष सेना पाचोरा) यांचा इशारा

दिलीप जैन.(पाचोरा)
१८/११/२०२०
जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील मौजे टोळी येथील एका वीस वर्षाच्या तरूणीवर चौघांनी सामूहिक बलात्कार नंतर तिला विष पाजून ठार केल्याची घटना घडली असून. या घटनेतील तरुणीचा मृत्यू झाला असून पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
ही घटना घडल्यानंतर महाराष्ट्रभर संतप्त प्रतिक्रिया उमल्या होत्या
याच घटनेतील सहभागी असलेल्या आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावे या करीता हा खटला फास्ट ट्रँक कोर्टात चालवून या पिडीत मुलीच्या हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी व पिडीत तरुणीच्या कुटूंबीयांना सुरक्षा पुरविण्यात यावी अन्यथा लहुजी संघर्ष सेना (महाराष्ट्र राज्य)पाचोरा यांच्या तर्फे महाराष्ट्रभर तिव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा लहुजी संघर्ष सेनेचे जेष्ठ नेते श्री.मधूकरजी आहिरे , जळगाव जिल्हाध्यक्ष श्री. सुखदेव आव्हाड, तालुकाध्यक्ष पाचोरा पांडुरंग अवघडे,एकनाथ गायकवाड, उत्तर महाराष्ट्र सचिव नाना भालेराव , तालुका उपाध्यक्ष सुरेश सोनवणे , राष्ट्रीय चर्मकार महासंघ तालुका अध्यक्ष गोवर्धन देवचंद जाधव व लहुजी सेनेच्या कार्यकर्त्यांनी पाचोरा पोलीस स्टेशनला निवेदनाद्वारे दिला आहे. या वेळी असंख्य कार्यकर्ते व समाजसेवक हजर होते