पहुरी गावात सरपंच, सदस्य व पोलिसांनी केली गावठीदारु हद्दपार.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०५/२०२१
सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव जवळील पहुरी गावात गावरान हातभट्टीची दारू बनवून विकणाऱ्या विक्रेत्यांनी पहुरी गावात धुमाकूळ घातला होता. गावातच गावठीदारु मुबलक प्रमाणात मिळत असल्याने तरुण तुर्क, म्हातारे अर्क व अल्पवयीन मुलेही दारुच्या आहारी गेले होते. यामुळे गावात दररोज जसा दारुड्यांचा बाजारच भरायचा. व्यसनाधीन लोक व्यसनपूर्तीसाठी कोणत्याही घर संसारपयोगी वस्तू विकून तर काही कर्ज काढून व्यसनपूर्ती करत होते.
तसेच हे दारुडे गावात रस्त्यावरून जातांना धिंगाणा घालत असत. विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या कालावधीत हाताला काम नसतांनाच दारुवर पैसे उडवले जात होते म्हणून माताभ भगिनींना घरसंसार चालवणे मुश्कील झाले होते. यातूनच घराघरात भांडण, तंटे व्हायचे यामुळे गावातील शांतता भंग झाली होती.
ही बाब पहूरी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.हिराबाई धनजी मोरे यांना सहन झाली नाही कारण बऱ्यापैकी महिलांनी आपली आपबिती त्यांना सांगून गावातील दारुबंदी झाली पाहिजे अशी गळ घातली सरपंच सुध्दा महिलाच असल्याने त्यांना महिलांचे दुख कळाले व त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पहूरी गावातून गावठीदारु हद्दपार करण्यासाठी विडा उचलला.
सरपंच मा. सौ. हिराबाई धनजी मोरे यांनी उपसरपंच व सर्व सदस्यांना सोबत घेत पोलीस निरीक्षक मा. श्री. सुदाम शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली पहूरी गावातील अवैधरीत्या दारु विक्री करणाऱ्या लोकांच्या घरोघर जाऊन माझ्या कार्यकाळात मी दारू विक्री करू देणार नाही असे सांगितले व यापुढे गावात कोणीही दारु विकण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशी समज दिली. दारुबंदी यशस्वी व्हावी म्हणून गीते साहेब, दुबेले साहेब, तळेकर साहेब , गायकवाड साहेब यांनी गावात तीन दिवस ठिय्या मांडला व दारू विक्रेत्यांना दारु विक्री बंद करण्यास भाग पाडले.
गावाच्या सरपंच, सदस्य यांची एकता व गावाचे एकमताने व पोलिसांनी दिलेल्या सहकार्यामुळे दारु विक्रेत्यांची दातखीळ बसली व यापुढे पहुरी गावात दारू विकली जाणार नाही असे आश्वासन दिले.
या दारुबंदीसाठी सोयगाव तालुक्यातील एम.आय.एम.चे अध्यक्ष आखिर दादा व पुढारी पत्रकार चे भावराव मोरे व पत्रकार प्रज्वल चव्हाण, बापू डवणे माजी सरपंच निलेश भाऊ मगर यांचे दारुबंदी करण्यासाठी सहकार्य लाभले.गावात संपूर्ण दारुबंदी झाली म्हणून नाना मोरे व पहूरी गावातील सुज्ञनागरीक व महिलांनी सगळ्यांचे आभार माणले.
TAGS