कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत, महाविकास आघाडीच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०४/२०२३
पाचोरा, भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विद्यमान आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांचे स्वतंत्र पॅनल तसेच माजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ वाघ, उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जेष्ठ नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी व राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. सचिन सोमवंशी यांचे महाविकास आघाडीचे पॅनल तसेच मा. श्री. अमोल भाऊ शिंदे यांनी स्वतंत्रपणे दंड थोपटले असून तिघही पॅनलचे जेष्ठ, श्रेष्ठ नेते कार्यकर्ते प्रचाराला लागले आहेत.
याच प्रचाराच्या रणधुमाळीत आज माजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ वाघ व सचिन सोमवंशी यांनी त्यांचे असंख्य कार्यकर्ते सोबत घेत अंबे वडगाव, कोल्हे, अटलगव्हान, कळमसरा, कासमपुरा, लोहारा, कुऱ्हाड गावातील ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन व सदस्यांच्या भेटी घेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती वाचवण्यासाठी ठिकठिकाणी आपले ध्येय मांडत महाविकास आघाडीला निवडू द्या असे आवाहन केले. या प्रचार दौऱ्यात ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
येत्या २३ एप्रिल २०२३ रविवार रोजी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मा. श्री. उध्दव ठाकरे साहेब यांची पाचोरा येथे जाहीर सभा घेण्यात येणार असल्याकारणाने त्यांच्या सभेसाठी आयोजन, नियोजन करण्यासाठी सौ. वैशालीताई सुर्यवंशी व्यस्त असल्याकारणाने त्या आजच्या प्रचार दौऱ्यात उपस्थित राहु शकल्या नाहीत असे त्यांनी कळवले असून परवा पासून त्या नियमितपणे प्रचाराची धुरा सांभाळणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.