लोणी कुणबी पाटील समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने, संदिप बोरसे उत्कृष्ट छायाचित्रकार म्हणून सन्मानित.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/११/२०२२

जळगाव येथील लोणी कुणबी पाटील समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील छायाचित्रकार मा. श्री. संदिप बोरसे यांना उत्कृष्ट छायाचित्रकार म्हणून सन्मानित करण्यात आले. तसेच जळगाव येथील लोणी कुणबी पाटील समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने इयत्ता १० वी, ते इयत्ता १२ वी व पदवीधर, पदव्युत्तर परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यीव पालकांसह प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.

या शुभप्रसंगी कार्यक्रमाचे सुरवातीला मा. श्री. आमदार राजूमामा भोळे, उपमहापौर मा. श्री..लभूषण पाटील, माजी उपमहापौर तथा नगरसेवक सुनील खडके, नगरसेवक डॉ. विरेंद्र खडके, सामाजिक कार्यकर्ते भरत कोळी, जीवन विकास केंद्राचे डॉ. विकास निकम, शिक्षक संजय सावळे, नगरसेवक अमित काळे, सामाजिक कार्यकर्ते पियुष कोल्हे, शंकर पाटील, महिला बाल कल्याण समिती सभापती मलकापूर छाया पाटील, बी. टी. पाटील व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजनाने करण्यात आले.

ब्रेकिंग बातम्या