मा.वसंतराव मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त रावेर पत्रकार संघाच्या वतीने मोफत मास्क वाटप.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/०१/२०२१
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे प्रदेशाध्यक्ष मा.वसंतराव मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज दि.1जाने.रोजी रावेर तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने कोरोनाची दुसरी लाट पसरु नये म्हणून रावेर शहरात तहसील कार्यालय परिसर व पंचायत समिती कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, पोलीस स्टेशन,जुनी तहसील कार्यालयाच्या आवारात तसेच बस स्थानक परिसरात, रिक्षा स्टँड, फळंभाज्या विक्रेता,दुकानावर ,चहा टपरी, सह सार्वजनिक गर्दी च्या ठिकाणी रावेर तालुका पत्रकार संघाच्या वतीने शेकडो मास्क वाटप करण्यात आले,
तसेच नुकत्याच अनेक मोठ्या गावाच्या ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी सुरू झाली असून यामुळे रावेर शहरातील प्रमुख कार्यालये व परिसरात मोठ्या संख्येने गर्दी उसळत आहे, यामुळे सोशल डिस्टींगचे धिंदवडे निघत असताना त्यात कोरोनाची दुसरी लाट जाणवत आहे, यामुळे दोन तीन दिवसांत जिल्ह्यातील कोरोना ची रुग्णांना ची संख्या वाढत चालली आहे, यामुळे सर्व सामान्य जनतेला परत कोरोनाचा संसर्ग व विळाखा पडू नये म्हणून रावेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास ताठे, उपाध्यक्ष संतोष नवले,कार्याध्यक्ष योगेश सैतवाल, तालुका संघटक प्रदीप महाराज, शहराध्यक्ष विनोद कोळी,सहसंघटक विनायक जहुरे, प्रमोद कोंडे, सद्दाम पिंजारी, प्रभाकर महाजन, सह पत्रकार संघाच्या सदस्य व कार्यकारिणी पत्रकार बंधुंनी समाजाप्रती संवेदनशीलता कर्तव्य दक्ष, तत्परतेने जागरूकता निर्माण करण्यासाठी शेकडो मास्क मोफत सोशल डिस्टिंग चे पालन करून विविध ठिकाणी वाटप करण्यात आले.