मातोश्री पाणंद रस्ते कामातील दिरंगाई बाबत आ. किशोर आप्पा पाटील यांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/११/२०२२

आधीच निर्सगाच्या लहरीपणामुळे हतबल झालेला शेतकरी व त्यातच शेतात जाण्यायेण्यासाठी रस्ते नसल्याने शेतात बि, बियाणे, खते, शेती अवजारे शेतात नेण्यासाठी तसेच राबराब राबुन शेतात पकवलेला शेतीमाल घरी आणण्यासाठी शेतकऱ्यांना चांगले रस्ते नसल्याने पाचोरा भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना शेत रस्त्यामुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन पाचोरा, भडगाव तालुक्याचे लाडके आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांची शेतकऱ्यांना चांगले रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी आधीपासूनच आग्रही भूमिका होती. तसेच पाचोरा, भडगाव मतदारसंघात सुमारे ८०० किलोमीटर अंतराच्या लांबीच्या रस्त्यांची आवश्यकता आहे ही बाब लक्षात घेऊन त्यांनी सतत पाठपुरावा करुन राज्य शासनाच्या मातोश्री शेत पाणंद रस्ते योजनेतून पहिल्या टप्प्यात १०० किलोमीटर लांबीचे ८१ रस्ते मंजूर करुन शेतकऱ्यांना दिलासा दिला असून अजूनही २०० किलोमीटर लांबीचे शेत रस्ते मंजूरीच्या प्रतिक्षेत आहेत.


शेत रस्ते नसल्याने डोक्यावर कापसाचे गाठोडे घेऊन घराकडे निघालेला शेतकरी.

असे असले तरी अद्यापही राज्य शासनाच्या मातोश्री शेत पाणंद रस्त्यांच्या मंजूर झालेल्या ८१ रस्त्यावर काम करण्यासाठी प्रती एक किलोमीटर रस्त्याचे कामासाठी २८ ते ३० लक्ष रुपये याप्रमाणे निधीस मंजूर दिली आहे. तरी सुद्धा पाचोरा, भडगाव मतदारसंघात मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली नसल्याने आज दुपारी १२ वाजता उपविभागीय अधिकारी मा. श्री. डॉ. विक्रम बांदल यांच्या कार्यालयात शेत पाणंद रस्त्यांच्या कामांना गती देण्यासाठी आढावा बैठक घेत रस्ते कामाच्या दिरंगाईला जबाबदार असणारे सार्वजनिक बांधकाम विभाग, गटविकास अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना फैलावर घेत पाणंद रस्त्यांच्या कामांना त्वरित सुरुवात करुन ते आगामी पावसाळा सुरु होण्याआधी त्वरित पूर्ण करण्यासाठी आदेशीत करत ढिसाळ नियोजनाबाबत तिव्र नापसंती व्यक्त व्यक्त केली.

या शेत पाणंद रस्त्यांच्या बैठकीत मा. श्री. तहसीलदार कैलासजी चावडे, पाचोरा गटविकास मा. अधिकारी अतुल पाटील, भडगावचे गटविकास अधिकारी वाघ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते श्री. थोरात, श्री. वाडीले, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, भडगाव तालुकाप्रमुख संजय पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील, स्वीय सहाय्यक राजेश पाटील, प्रवीण ब्राह्मणे यांची उपस्थिती होती.
——————–
*प्रतिक्रिया:* शेतरस्ता हा शेतकरी बांधवांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय असून आगामी २०२४ पर्यंत शेतकऱ्यांनी मागणी केलेले पाचोरा व भडगाव तालुक्यातील सुमारे आठशे किलोमीटर लांबीचे शेतरस्ते आपण पूर्ण करण्याचे उद्धिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. शेतकरी बांधवानी देखील रस्ते होणे कमी कोणताही अडथळा निर्माण न करता समन्वय व परस्पर सहकार्यातून प्रशासनास सहकार्य करावे जेणेकरून भविष्यात शेतकरी बांधवाला रस्त्याअभावी कोणतीही अडचण येणार नाहीत.
*किशोर अप्पा पाटील*
*आमदार पाचोरा-भडगाव*

ब्रेकिंग बातम्या