दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/१०/२०२२

पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथील रज्जाक जमन तडवी यांच्या मालकीचा लम्पी प्रतिबंधक लसीकरण केलेला बैल लम्पी आजाराने दगावल्यामुळे संबंधित शेतकऱ्याचे अंदाजे पस्तीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे आता रब्बी हंगामातील पिके घेण्यासाठी शेतजमीन तयार करण्यासाठी बैलजोडी आवश्यक आहे. तसेच रज्जाक तडवी यांची परिस्थिती जेमतेम असल्याकारणाने ते बैलजोडी भाड्याने देऊन दोन पैसे कमावत होते. आता एक बैल दगावल्याने पस्तीस हजार रुपये नुकसान झाले असून सोबतच त्यांच्या हाताची मजुरी गेली असल्याने यांना त्वरित आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली जात आहे.

तसेच पाचोरा तालुक्यातील सार्वे, जामने, कुऱ्हाड, अंबे वडगाव, अंबे वडगाव खुर्द, अंबे वडगाव बुद्रुक, डांभुर्णी, व इतर गावातून गुराढोरांना शंभर टक्के लसीकरण केले गेले आहे तरीही त्या लसीकरण केलेल्या गुराढोरांना लागण होत असल्याने पशुधनपालक धास्तावले आहेत.