युवासेना प्रमुख मा. श्री. आदित्य ठाकरे यांच्या शिव संवाद दौऱ्याला पाचोऱ्यातून सुरवात.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०८/२०२२
महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यटन तथा पर्यावरण, वातावरणीय बदल, व राजशिष्टाचार खात्याचे मंत्री तथा शिवसेनेचे युवासेना प्रमुख मा. श्री. आदित्य ठाकरे यांचा जळगाव जिल्ह्यात शिव संवाद दौरा निश्चित झाला असून या शिव संवाद दौऱ्याची सुरुवात पाचोरा शहरातून होणार असल्याची माहिती शिवसेनेचे माजी आमदार स्वर्गीय तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांच्या कन्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. तसेच मी स्व. तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मा. श्री. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्या पासून पाचोरा मतदार संघाच्या राजकारणात सक्रिय होणार असल्याचे सांगितले.
या दौऱ्याबाबत अधिक माहिती अशी की युवासेना प्रमुख मा. श्री. आदित्य ठाकरे हे २० ऑगस्ट २०२२ शनिवार रोजी जळगांव जिल्ह्यात शिव संवाद दौऱ्या निमित्ताने ते जळगाव येथून पाचोरा येणार असून पाचोरा शहराकडे येतांना त्यांचे सामनेर व जागोजागी शिवसैनिकांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात येणार आहेत. नंतर जारगाव चौफुली मार्गे ते भडगावरोड वरील महाराणा प्रताप चौकातून छत्रपती संभाजी महाराज चौकातून, छत्रपती शिवाजी महाराज, हुतात्मा स्मारकात अभिवादन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून शिवसेनेचे मध्यवर्ती शिवतीर्थ कार्यालया समोरील रस्त्यावर जनतेशी संवाद साधणार आहेत.
या दौऱ्यात युवासेनाप्रमुख मा. श्री. आदित्य ठाकरे यांच्या समवेत जिल्हाप्रमुख मा. श्री. गुलाबराव वाघ, मा. श्री. हर्षल माने, मा. श्री. विष्णू भंगाळे, मा. श्री. दिपक राजपूत, मा. श्री. समाधान महाजन, महिला आघाडीच्या पदाधिकारी महानंदा पाटील, जळगांव महापौर जयश्री ताई महाजन, उपमहापौर मा.श्री. कुलभूषण पाटील, महानगर प्रमुख मा.श्री. शरद तायडे आदींचा समावेश असणार आहे.
या दौऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे पाचोरा तालुक्याचे दोन वेळा आमदार झालेले स्व. आर. ओ. पाटील यांच्या सुकन्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी ह्या स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला भगवा खांद्यावर व शिवसेनेचे दावेदार सेना प्रमुख तसेच माजी मुख्यमंत्री मा. श्री. उध्दव ठाकरे यांचे शिवधनुष्य हातात घेऊन पाचोरा, भडगाव मतदारसंघातून राजकीय रणसंग्रामात तयारीनिशी सक्रिय होणार आहेत.
सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या या निर्णयामुळे पाचोरा, भडगाव मतदारसंघात ठाकरे साहेबांची शिवसेना व शिंदे यांची स्वयंघोषित शिवसेनेत कमालीचा राजकीय संघर्ष पहावयास मिळणार असल्याची जोरदार चर्चा पाचोरा, भडगाव विधानसभा मतदारसंघातून ऐकावयास येत असून या शिव संवाद दौऱ्यात मा. श्री. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत व सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो तरुण शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
पाचोरा नगरीत संवाद साधल्यानंतर आदित्य ठाकरे हे निर्मल सिडस येथे भेट देऊन भडगावला नियोजित कार्यक्रमात हजेरी लाऊन नंतर पुढील आयोजित कार्यक्रमाला रवाना होणार आहेत. मा. श्री. आदित्यजी ठाकरे यांचा झंझावाती दौरा पाचोरा, भडगाव तालुक्यात वादळी ठरणार असून शिवसेनेची ताकद नक्कीच वाढणार असल्याचे दिसून येत आहे.
यावेळी पत्रकार परिषदेत विधानसभा क्षेत्राचे जेष्ठ शिवसैनिक शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख मा. श्री. अरुण भाऊ पाटील, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख मा. श्री. रमेशचंद्रजी बाफणा, उपजिल्हा प्रमुख एडवोकेट मा. श्री. अभय दादा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. उध्दवभाऊ मराठे, तालुकाप्रमुख मा. श्री. शरद पाटील, मा. श्री. नरेंद्रसिंग सुर्यवंशी, सह शिवसैनिक उपस्थित होते.