पिंपळगाव हरेश्वर पोलीसांच्या वॉश आऊट मोहिमेत शिंदाड येथील सात गावठी दारुच्या भट्ट्या उध्वस्त.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०४/२०२४
पाचोरा तालुक्यातील शिंदाड गावालगतच्या शिवारात काही लोक मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्टीच्या दारुची अवैध निर्मिती व विक्री करत होते. तसेच मोठ्या प्रमाणात दारु गाळून वरखेडी, वडगाव आंबे, पिंपळगाव हरेश्वर व इतर गावांना मोठ्या प्रमाणात दारु घरपोच पाठवत होते. यामुळे शिंदाड येथील गावठी दारुची निर्मिती व विक्री आसपासच्या दहा खेड्यापाड्यातील लोकांची डोकेदुखी ठरत होती.
हि गुप्त माहिती पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. प्रकाश काळे यांना मिळाल्यावर त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक मा. श्री. महेश्वर रेड्डी, विभागीय पोलीस अधीकार मा. श्री. धनंजय वेरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल रणजित दादा पाटील, पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र पाटील, अमोल पाटील, उज्वल जाधव, अभिजित निकम यांना शिंदाड शिवारात पाठवून आज दिनांक २२ एप्रिल २०२४ सोमवार रोजी सात भट्ट्यांची तोडफोड करत गावठी दारुच्या निर्मितीसाठी लागणारे हजारों रुपयांचे कच्चे, पक्के रसायन, प्लॅस्टिक टाक्या व इतर साहित्य नष्ट असून संशयित आरोपी सचिन मनोज तडवी, दिलावर अन्वर तडवी यांना ताब्यात घेत दारुबंदी कायद्यानुसार कारवाई केली आहे. पोलीस आल्याची कुणकुण लागताच इतर हातभट्टीची दारु निर्मिती व विक्री करणाऱ्यांनी पळ काढला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्वच गावागावातून अवैध धंद्याच्या विरोधात वॉश आऊट मोहीम राबविण्यात येणार असून कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही. असे पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. प्रकाश काळे साहेबांनी जाहीर केले आहे. या झालेल्या मोठ्या कारवाईमुळे अवैध धंदे करणारांचे धाबे दणाणले असून सुज्ञ नागरिक व महिला वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.