धक्कादायक! स्वतःवर गोळी झाडून सहाय्यक पोलीस निरीक्षकाने केली आत्महत्या.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०२/२०२१
नवी मुंबई येथील एपीएमसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण पवार यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. रविवारी म्हणजेच आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिस ठाण्यात आल्यानंतर ते स्वतःच्या केबिनमध्ये जाऊन बसले. त्यानंतर काही वेळाने गोळी झाडल्याचा आवाज आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेतली असता हा प्रकार उघड झाला .दरम्यान पवार हे मागील काही दिवसांपासून मानसिक तणावात होते. यामुळे ते सतत शांत रहायचे. यामुळे अनेकांनी त्यांच्याकडे तणावाच्या करणाबाबत चौकशी देखील केली होती. परंतु त्यांनी स्वतःच्या तणावाबाबत कोणाकडे वाच्यता केली नव्हती. मात्र ते आर्थिक परिस्थिती व कौटुंबिक कारणाने त्रस्त होते असेही काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
हडपसर मध्ये केली होती ड्युटी
भूषण पवार हे अतिशय मृदू स्वभावाचे अधिकारी होते, व्यायामाची आवड असल्याने त्यांनी पिळदार शरीरयष्टी बनविली होती, हडपसर पोलीस ठाण्यात ते सहायक पोलिस निरीक्षक म्हणून काही वर्षांपूर्वी कार्यरत होते, अनेक गुन्हे उकल करण्यात त्यांनी मोठी कामगिरी बजावली होती, समाजासाठी अहोरात्र ड्युटी बजावत असताना कौटुंबिक तणाव झाल्याने त्यांनी आत्महत्या केली त्यांच्या अकाली मृत्यूने हडपसर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.