मांगीतुंगी तिर्थक्षेत्रास कुसुंबा जैन समाज पद्मावती युवामंच शिष्टमंडळाची भेट.
गौरव जैन.(कुसुंबा)
दिनांक~२४/०३/२०२२
आचार्य वर्धमान सागरजी सह २७ जैन मुनीसंघास पाचारण
श्रवणबेळगोळाहून महावीरजी अतिशय क्षेत्र (राजस्थान) विहार करीत असतांना सद्यास्थित मांगीतुंगी तिर्थक्षेत्र येथे प.पू. आचार्य महानतपस्वी वासल्यमूर्ती श्री १०८ वर्धमान सागरजी मुनीश्री सह २७ दिगम्बर जैन मुनीसंघाचे मांगीतुंगी क्षेत्र येथे आगमन झाले आहे. अशी माहिती खान्देश जैन समाजाचे प्रसीध्दी प्रमुख व पत्रकार सतीष वसंतीलाल जैन यांनी दिली.
हे वृत्त कळताच येथील जागृत पद्मावती युवा मंचानी महेंद्र जैन च्या नेतृत्वात बैठक बोलविण्यात आली. पूज्यश्री सहसंघाच्या सान्निध्यात विविध कार्यक्रम संपन्नता विषयी विचार विनीमय सर्वानुमते हेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाल्यानंतर युवामंचचे शिष्टमंडळाचे उशीर न करता आज दिनांक २४/३/२०२२ वार गुरूवार रोजी पंडित प्रदिपमधुर शास्रीच्या नेतृत्वात प्रथम मंडळाने जायखेडा नंतर दोन वेळा मांगीतुंगीत पूज्यश्रींची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा करून मंचने अर्घ्य चढवून सहसंघ कुसुंबा येथे शुभागमन व्हावा यासाठी युवकांनी अथक परिश्रम घेऊन पूज्यश्री आचार्य महाराज वर्धमान सागरजी यांना आपआपल्या भावना व्यक्त करून कुसुंबा अतिशय क्षेत्र येथे आगमनाचा आग्रहधरूण विनंती केली.
कुसुंबेकर समाज पद्मावती युवा मंचची भावना लक्षात घेता पूज्यश्रींचा कुसुंब्यात येणार हे संकेत मिळताच भाविकात उत्साह संचारला त्यामुळे आगमनाची पूर्व तयारी जोरात सुरू झाली आहे कुसुंबेकरांचे धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसरपणा दिसून येते त्याचे हेच ते उदाहरण होय अहिंसाप्रेमी बांधवाना पूज्य आचार्य वर्धमान सागरजी मुनीश्रींचा अमृतवाणीचा लाभ मिळणार आहे. पूज्यश्री सहसंघाचा २६ वर्षानंतर आगमनाचा लाभ मिळणार आहे.
या शुभ प्रसंगी मांगीतुंगीत प.पू. आचार्यश्रींचा कुसुंबा आगमनासाठी अर्घ्य चढवून विनंती करून चर्चा करतांना समवेत सौ अनिता जैन, प्रतिष्ठाचार्य प्रदिपकुमार जैन, महेंद्र जैन, वालचंद जैन, पारस जैन, श्रुतकुमार जैन, मयुर जैन, स्वप्नील जैन, पंकज जैन, रोशन जैन, राहुल जैन, राजु जैन, चंद्रकांत जैन, राजेंद्र जैन, वर्धमान जैन, रिखब जैन आदि भक्तगण उपस्थित होते.