पाचोरा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, रमेशचंद्रजी बाफना.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०७/२०२२
जळगाव जिल्ह्यासह पाचोरा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी रमेशचंद्रजी बाफना यांनी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की यावर्षी जून महिन्याच्या सुरवातीला पावसाने हुलकावणी दिली मात्र त्यानंतर पाचोरा तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. या संततधार पावसामुळे कोळपणी, निंदनीय, फवारणी व खत देणे खोळंबल्याने पिकांची पाहिजे तशी वाढ झाली नसून सूर्यप्रकाश न मिळाल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच सततच्या संततधार पावसामुळे सूर्यप्रकाश न मिळाल्याने पिके पिवळी पडून मुळ सडून पानगळ होत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी घेतलेले महागडे बियाणे, खते, नांगरटी, वारकरी, पेरणी, फवारणी यावर केलेला खर्च सुद्धा हातात येणार नसल्यासारखी परिस्थिती लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्यासह पाचोरा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकट अनुदान देण्यात यावे अशी मागणी रमेशचंद्रजी बाफना यांनी केली आहे.