कुऱ्हाड खुर्द येथे विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०२/२०२२
भगवान विश्वकर्मा देवांचे वास्तुकला तज्ञ आहेत. त्यांनी भगवान श्रीकृष्णासाठी द्वारका,पांडवासाठी हस्तिनापूर व रावणासाठी सोन्याची लंका तयार केली. या नगरांच्या रचनेत, सौंदर्य, अचुकता व सुखसोयी यांचा मिलाप होता.ते वास्तुशास्त्राचे पहिले प्रणेते आहेत. भगवान विश्वकर्मा यांनी लंकेत प्रवेश करण्यासाठी श्रीरामाला सहकार्य केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच महाबली हनुमान, नल−निल या सारख्या वानरसेनेतील स्थापत्य तज्ञांनी रामसेतू बांधला.भगवान विश्वकर्मा यांनी १४ ब्रम्हांडाची रचना केली. त्यात वायुमंडळ, कैलास,वैकुंठ, ब्रम्हपुरी, इंद्रपुरी,स्वर्ग, पृथ्वी, पाताळातील नागलोक इत्यांदिंची रचना केली होती.
त्यांनी ‘विश्वकर्मा वास्तुशास्त्र’ या ग्रंथाची रचना केली.ब्रह्माच्या इच्छेनुसार त्यांनी नित्य नवीन औजारे शोधलीत.त्यांना सौर उर्जा वापरण्याचे व त्या उर्जेच्या नियंत्रणाचे ज्ञान प्राप्त होते. सूर्याचे या शक्तिचा वापर करून त्यांनी विष्णु शिव व इंद्रासाठी क्रमाने सुदर्शन चक्र, त्रिशूळ व विजय रथ निर्माण केला.ते हरहुन्नरी होते.अन्य विविध शास्त्रांच्या निर्माणात, त्याचे नियम ठरविण्यात,व त्या त्या शास्त्रांच्या विकासास त्यांनी हातभार लावला.शस्त्रे व अस्त्रे, अलंकार, विमान आदिंचेही त्यांनी निर्माण केले.सुमारे १२००च्या जवळपास यंत्र-तंत्र,शस्त्रास्त्रे व साधनांच्या त्यांनी निर्मिती केली.पांडवांसाठी मयसभा बनविणारा मयासूर त्यांचा शिष्यच होता.
आजही सोनार,लोहार,सुतार,कुंभार,कासार, पाथरवट इत्यादी समाज त्यांना आपले दैवत मानतात. म्हणून भारतात आजचा दिवस त्यांची जयंती म्हणुन साजरा करण्यात येतो.
यानिमित्ताने आज पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथील लोकमतचे पत्रकार मा.श्री. सुनील लोहार यांच्या घरी भगवान विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. महेंद्र वाघमारे साहेब यांच्या हस्ते भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. वाघमारे साहेबांनी पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेनशचा पदभार स्वीकारल्यानंतर ते प्रथमच कुऱ्हाड गावात आले होते. म्हणून कुऱ्हाड येथील लोकमतचे जेष्ट पत्रकार मा.श्री. सुनील लोहार व अंबे वडगाव येथील मा.श्री. संतोष पाटील यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी कुऱ्हाड येथील सर्व गावकरी मंडळी, पत्रकार बांधव, कुऱ्हाड खुर्दचे सरपंच कैलास भगत, पोलिस पाटील संतोष सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य कौतिक पाटील, उपसरपंच अशोक देशमुख, संतोष पाटील वडगाव अंबे, भाजप गण प्रमुख जगदीश तेली, तंटा मुक्ती अध्यक्ष श्रीधर महाजन, भाजप वैद्यकीय आघाडीचे डॉ.प्रदीप महाजन, विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य व ग्रा.प.सदस्य सुधाकर महाजन, माजी उपसरपंच रामदास देशमुख, कैलास चव्हाण, मा.सरपंच किरण पाटील, लोहार समाजाचे मोहन लोहार, बाळू लोहार, ईश्वर लोहार, योगेश लोहार, संकेत लोहार, जयदीप लोहार, सचिन माळी, महेन्द्र बोरसे, पोलीस कर्मचारी रणजित पाटील, अरुण राजपूत व गावातील लोहार सुतार समाज बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.