शेंदुर्णी नगरीत प. पु. राधाकृष्णजी महाराजांच्या उपस्थितीत उद्या प्रभातफेरी व प्रवचनाचे आयोजन.

देवेंद्र पाडळकर.(शेंदुर्णी)
दिनांक~१६/०२/२०२३

जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी नगरीत गेल्या १३ वर्षांपूर्वी ज्यांच्या प्रेरणेने प्रभातफेरी सु्रु केली होती व तेव्हापासून ही प्रभातफेरी अखंडपणे सुरु आहे असे प्रेरणास्थान जोधपूर येथील परमपूज्य परम महंत हरिभक्त राधाकृष्णजी महाराज यांचे दिनांक १७ फेब्रुवारी २०२३ शुक्रवार रोजी सकाळी सहा वाजता शेंदुर्णी नगरीत आगमन होणार आहे.

यानिमित्ताने ज्यांच्या प्रेरणेने नियमितपणे सुरु असलेल्या या प्रभातफेरीत स्वाता परमपूज्य परम महंत हरिभक्त राधाकृष्णजी महाराज हे सकाळी सहा वाजता भगवान श्री. त्रिविक्रम महाराजांच्या मंदिरापासून सहभागी होणार असून ही प्रभातफेरी शेंदुर्णी शहरातून काढण्यात येणार असून ही प्रभातफेरी भगवान श्री. त्रिविक्रम महाराजांच्या मंदिराजवळ आल्यावर त्याच ठिकाणी परमपूज्य परम महंत हरिभक्त राधाकृष्ण जी महाराजांच्या अमृतवाणीतून प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी शेंदुर्णी नगरीतील जास्तीत, जास्त भाविक, भक्तांनी या प्रभातफेरीत सामील होऊन प्रवचनाचा लाभ घ्यावा व कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन प्रभातफेरी भक्त मंडळ व भाविकांनी केले आहे.