पिंप्री येथे बंद घरात प्रवेश करुन १० हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविला.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०७/२०२२
तालुक्यातील पिंप्री बुद्रुक येथील बंद घरात अनाधिकृतपणे प्रवेश करुन संसारोपयोगी वस्तुंसह २ हजार रुपये संशयीत आरोपीने चोरुन नेल्याची घटना आज दिनांक ९ जुलै २०२२ शनिवार रोजी उघडकीस आल्याने पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात संशयित आरोपी विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पाचोरा तालुक्यातील पिंप्री बुद्रुक येथील रहिवाशी पुष्पाबाई प्रभाकर नेरपगार (वय-६५) ह्या घरी नसतांना त्यांच्या घरात अज्ञात संशयित आरोपीने प्रवेश करत घरातील टेबल फॅन, एक तांब्याचे गंगाळ, एक मिक्सर, एक ५ लिटरचा कुकर, एक छत्री व २ हजार रुपये रोख असा १० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केल्याने पुष्पाबाई नेरपगार यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये संशयित आरोपी विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र शिंदे हे करीत आहे.