शेंदुर्णी नगरपंचायतीची विकासकामे निकृष्ट दर्जाची जगदीश नाथ यांचा आरोप.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०६/२०२२
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी हे मोठ्या लोकसंखेचे गाव असून या गावत नगर पंचायती तर्फे विविध विकासकामे करण्यात येत आहेत. तर काही विकासकामे करण्यात आली आहेत. परंतु ही विकासकामे करतांना शेंदुर्णी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी व सत्ताधारी हे मनमानी पद्धतीने कारभार करत असून मर्जीतील ठेकेदाराकडून कामे करुन घेत आहेत.
ही विकासकामे करुन घेतांना शेंदुर्णी नगरपंचायतीच्या हद्दीतील श्री. शिवाजी नगर भागात झालेल्या व सुरु असलेल्या सांडपाण्याच्या गटारी, रस्ते ही कामे शासकीय नियमानुसार होत नसून रस्ते व सांडपाण्याच्या गटारी बनवतांना अतिक्रमण काढून काम करणे गरजेचे आहे. परंतु अतिक्रमण धारकांना अभय देऊन रस्ता व सांडपाण्याच्या गटारी बनवतांना लेआऊट नुसार ०९ मिटर रुंदीचा रस्ता बनवणे क्रमप्राप्त होते. मात्र अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण न काढता रस्ता बनवण्याचे काम सुरु असल्याने शासनाच्या नियम व अटी प्रमाणे रस्ता होत नसल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे.
या निकृष्ट दर्जाचे होणाऱ्या कामांची चौकशी होऊन दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी म्हणून वारंवार तक्रारी करुनही संबंधितांची व संबंधित भ्रष्टाचारातून होत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी होत नसल्याने जगदीश नाथ यांनी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. श्री.अभिजीत राऊत साहेब यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र तरीही नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मा. साजिद पिंजारी यांची किंवा होणाऱ्या निकृष्ट कामांची कोणतीही चौकशी झाली नाही म्हणून तक्ररदार जगदीश नाथ यांनी विभागीय आयुक्त नाशिक (जळगाव) विभाग यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीची दखल घेत विभागीय आयुक्त नाशिक यांनी जळगाव जिल्हाधिकारी यांना चौकशीसाठी आदेश दिले होते परंतु त्या आदेशानुसार अद्यापपर्यंत कोणतीही चौकशी झाली नसल्याचे जगदीश नाथ सांगतात. तसेच मी केलेल्या तक्रारीची त्वरित चौकशी होऊन शेंदुर्णी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी व जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई न झाल्यास मी मंत्रालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे जगदीश नाथ यांनी सांगितले आहे.