वरखेडी येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेतर्फे सागर चौधरी यांचा सत्कार.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०६/२०२२
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील पाचोरा ते जामनेर रस्त्यावरील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेत व डॉ. प्रितेष संकलेचा यांच्या घरी दिनांक १२ जून २०२२ रविवार रोजी सकाळी साडेतीन वाजेच्या सुमारास चोर चोरीचा प्रयत्न करत असतांनाच वरखेडी येथील सागर अशोक चौधरी यांच्या प्रसंगावधानामुळे व त्याने हिंमतीने चोरट्यांशी दोन हात करत चोरट्यांना पळवून लावल्यामुळे चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला व पुढील अनर्थ टळला होता. या सागर चौधरीच्या व त्याचे भाऊ योगेश चौधरीच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सागर चौधरी व त्यांचे भाऊ योगेश चौधरी यांच्या धाडसाने बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेत व डॉ. प्रतेश संकलेचा यांच्याकडे चोरी करण्यासाठी आलेले चोरट्यांना पाळुन लावले होते. यामुळे बॅंकेचे होणारे नुकसान थांबले याची दखल घेत वरखेडी येथील बॅंक ऑफ महाराष्ट्राचे शाखा व्यवस्थापक मा. श्री. निशांत कटके साहेब व कॅशियर मा. श्री. निखिल सरोदे साहेब, ऑफिसर मा. श्री. अक्षय कांबळे, यांनी दाखल घेत पंचायत समिती सदस्य मा. श्री. ज्ञानेश्वर भाऊ सोनार, वरखेडीचे पोलीस पाटील मा. श्री. बाळु भाऊ कुमावत, यांच्या उपस्थितीत धाडसी तरुण सागर चौधरी यांच्या पाठिवर कौतुकाची थाप देत शाल, श्रीफळ देऊन सत्कार करत सन्मानित केले.
याप्रसंगी लोहारी येथील ग्राहक सेवा केंद्राचे संचालक मा. श्री. सतीश खैरनार, बॅंक कर्मचारी मा. श्री. निकम काकाजी, गजानन देवरे, पवन वाघ हे उपस्थित होते. सागर चौधरी यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.