कुऱ्हाड खुर्द येथे रमजान ईद निमित्त हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन.
सुनील लोहार.(कुऱ्हाड)
दिनांक~०३/०५/२०२२
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथे आज रमजान ईद निमित्त हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावर्षी रमजान ईद व अक्षय तृतीया हे दोघे सण योगायोगाने एकाच दिवशी आल्याने या प्रसंगी मुस्लिम व हिंदू बांधवांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते.
आजच्या या दुग्धशर्करा योगाचा मनमुरादपणे आनंद लुटत हिंदू व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना प्रत्यक्ष भेटुन तसेच भ्रमणध्वनीवर व समाज माध्यमांवर शुभेच्छा देऊन सामाजिक एकोपा जोपासलाचे दिसून येत होते.
आज सकाळी कुऱ्हाड खुर्द व कुऱ्हाड बुद्रुक येथील सर्व मुस्लिम समाज बांधवांनी इडगाह मैदानावर सामूहिक नमाज अदा केली. यावेळी दोन्ही गावातील आजी, माजी सरपंच, सोसायटी चेअरमन, सदस्य व अनेक नेते मंडळी व मान्यवर उपस्थित होते. कुऱ्हाड खुर्द व कुऱ्हाड बुद्रुक येथे शेकडो वर्षापासून हिंदू मुस्लिम बांधवांचा जातीय सलोखा टिकून असल्याचे हे जिवंत उदाहरण आज येथे बघायला मिळत आहे.
आजच्या या अक्षयतृतीया व ईद सणानिमित्ताने एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी मा.जि.प.सदस्य श्री.संतोष भिका चौधरी, भाजपा गण प्रमुख कुऱ्हाड- लोहारा श्री.जगदीश तेली, अरुण बोरसे, सतीश देशमुख, दत्तू चव्हाण, भगवान देशमुख, पांडुरंग देशमुख, मधुकर माळी, दिलीप माळी, खाजू दादा काकर, अकबर काकर, इम्रान काकर, रज्जाक काकर, इब्राहिम हवालदार, इस्माईल जनाब व बहुसंख्येने हिंदू, मुस्लिम बांधव उपस्थित होते